विदर्भ लोककलावंत संघटनेच्या लढ्याला मिळाले यश. : सांस्कृतिक कार्यमंत्री यांची मुदतवाढीची घोषणा.
वाशिम : राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी साधारतः एक महिन्याची मुदत वाढ करण्याची मागणी जिल्ह्यातील लोककलावंताच्या अग्रणी असलेल्या विदर्भ लोककलावंत संघटने कडून शासनदरबारी करण्यात आलेली होती. विशेषतः त्यासाठी महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त असलेले ज्येष्ठ लोककलावंत आणि संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय कडोळे यांनी जिल्ह्यातील आमदार खासदार यांच्याशीही संपर्क साधून,मा. मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मा. अमोलजी पाटणकर सर, मा. आशिष शेलार सांस्कृतिक मंत्री तसेच मा. विभिषणजी मोरे, संचालक सांस्कृतिक कार्य विभाग यांच्याकडे आपल्या मागण्यांचा पाठपुरावा केला होता. सोबतच जिल्ह्यातील सर्वच वृत्तपत्रे आणि सर्व पत्रकार संघटनांकडे विनम्र प्रार्थना करीत, "ज्येष्ठ साहित्यीक लोककलावंताना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी पत्रकारांना जास्तीत जास्त बातम्या प्रसिद्ध करण्याची विनंती केली होती व सर्वच लहानमोठ्या वृत्तपत्रांनी सहकार्य करीत,लोककलावंताच्या समस्यांना बातम्याद्वारे वाचा फोडली होती." अखेर सर्वांच्याच प्रयत्नाला यश येऊन,राज्याचे सांस्कृतिक मंत्री मा.आशिषजी शेलार यांनी दि. ३१ जुलै २०२५ रोजी,पंधरा दिवसांची मुदत वाढविण्यात आल्याचे घोषित केले आहे.
या संदर्भात अधिक वृत्त असे की,राज्यामधील राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान या योजनेअंतर्गत अर्ज भरण्यासाठीची शेवटची तारीख ३१ जुलै २०२५ ही होती. राज्यातील अनेक कलाकार व कलाकार संघटनांनी ही मुदत वाढवावी अशी मागणी सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्याकडे केली होती.
त्यांच्या विनंतीनुसार या योजनेअंतर्गत अर्ज भरण्यासाठी पंधरा दिवसाची मुदत देण्यात येत येत आहे,अशी घोषणा मंत्री शेलार यांनी केली आहे. या संदर्भात सांस्कृतिक कार्य संचालनालयाने योग्य ती कार्यवाही करावी.असे निर्देश ही त्यांनी दिले आहेत.त्यामुळे ज्येष्ठ साहित्यीक व वयोवृद्ध लोककलावंताना दिलासा मिळाला असून,विदर्भ लोककलावंत संघटनेचे संस्थाध्यक्ष संजय कडोळे, पदाधिकारी लोमेश पाटील चौधरी,प्रदिप वानखडे,विजय खंडार,नंदकिशोर कव्हळकर, रोहित महाजन, अजाबराव ढळे, शेषराव पाटील इंगोले,ज्ञानेश्वर खंडारे,सुरेश हांडे,माणिकराव पाटील हांडे,शंकरराव ढळे,कांता लोखंडे,इंदिरा मात्रे,देवका इंगोले,गजानन घुबडे,सागर कोटलवार,राजेंद्र डोळस, शिवमंगल आप्पा राऊत,प्रकाश गवळीकर,रामबकस डेंडूळे आदींनी आनंद व समाधान व्यक्त करीत,मुख्यमंत्री मा.देवेन्द्र फडणवीस, मा.आशिष शेलार,मा. मुख्यमंत्र्याचे विशेष कार्यकारी अधिकारी मा. अमोलजी पाटणकर, संचालक मा.बिभीषण मोरे,आ.सईताई डहाके व राज्यशासन इत्यादीचे आभार व्यक्त केले आहे. उल्लेखनिय म्हणजे लोककलावंताच्या विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील कार्यरत विदर्भ लोककलावंत संघटनेने १) लोककलावंताच्या मानधन वाढीसाठी केलेले धरणे आंदोलन असो,२) इ.सन.२०२४-२५ च्या मानधन लाभार्थ्याच्या मंजूरातीचा प्रश्न असो किंवा ३) ऑनलाईन अर्ज स्विकृतीसाठी मुदत वाढीचा प्रश्न असो. त्यासाठी सबळ पुराव्यासह भक्कम आवाज उचलला होता.व विशेष म्हणजे या संदर्भात ही सर्व आंदोलने संजय कडोळे यांच्या अथक प्रयत्नाने व विनम्र स्वभावाने त्यांनी यशस्वी करून दाखवीली असेच म्हणता येईल.
आपल्या प्रतिक्रिया द्या....