कारंजा : चालू कार्तिक महिन्यात लागोपाठ आलेल्या दिपावलीच्या सुर्यग्रहण आणि कार्तिक पोर्णिमेच्या चंद्रग्रहणाचा महाराष्ट्रातील राजकारणावर जबरदस्त परिणाम होण्याची शक्यता असून सहा महिन्याचे आतच सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागून महाराष्ट्रातील राजकारणात उलथापालथ होण्याची मोठी शक्यता आहे तसेच एका महिन्याचे आत मंत्रीमंडळ विस्तार झाला तरी आणि नाही झाला तरी सरकार मधील कुरकुरी बंडखोरी वाढण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे प्रत्येक राजकिय पक्षात बंडखोरी होणार आहे . तसेच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका हिवाळी अधिवेशनानंतर लगेच महाराष्ट्र निवडणूक आयोग घोषीत करेल . कारंजा येथील अनेक दिग्गज राजकिय नेत्यांचा पक्ष फेरबदल होईल. निवडणुका होऊन परत एकदा तरुण नवख्या व्यक्तिकडे नगराध्यक्ष पदाची धुरा येईल तर नगर पालिकेत यावेळी एक हाथी सत्ता न येता विविध पक्षाच्या नगरसेवकांची खिचडी आघाडी करावी लागेल . पूर्वीच्या ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाला आणि हस्तक्षेपाला चांगले दिसून येतील . आता आज मंगळवार दि ८ नोहेंबर रोजी चंद्रग्रहणाचे वेध लागलेले असून आकाशात चंद्रग्रहण चंद्र उगवताच पाहता येतील मात्र हे चंद्रग्रहण आकाशातील धुसर वातावरणामुळे अस्पष्ट दिसून येईल . चंद्रग्रहण पाच वाजून विस मिनिटांनी सुरु होणार असून,चंद्रग्रहण मोक्ष सायंकाळी सहा वाजून एकोणविस मिनिटांनी होणार आहे. यावर्षीच्या चंद्रग्रहणाचा आपल्या जन्मवेळी पुढील राशीत चंद्र असलेल्या वृषभ, धनू, सिह, मकर राशीला अधिक लाभ होणार असून, मेष, मिथुन, कन्या, कुंभ राशीला सुद्धा फायदाच होणार आहे त्यामुळे चंद्रग्रहणात आपल्या कुळदैवताचा जप आणि गरजू असलेल्या तळागाळातील, दिव्यांग, गोरगरीबांना मदतीचा हात देऊन चंद्रग्रहणाचे निमित्ताने जास्तित जास्त दानधर्म केला पाहीजे. यामध्ये अंधश्रद्धा कोणतीही नाही. ज्यांच्याकडे दान देण्यासाठी मोठे मन आहे त्यांनीच, संत गाडगे बाबाच्या दशसुत्री संदेशाचे पालन करीत सत्पात्री दान करून पुण्य मिळविले पाहिजे असे जय भवानी जय मल्हार वारकरी मंडळाचे संजय महाराज कडोळे यांनी कळविले आहे .