संजय कडोळे ( जिल्हा प्रतिनिधी वाशिम मो९०७५६३५३३८
कारंजा :
विद्यार्थ्यांनी कुटुंबाच्या आणि समाजाच्या ऋणाची जाणीव ठेवावी.ज्या मातीतून तुम्हाला संस्कार मिळतात,त्यावर तुमचे पालन पोषण होते, त्या मातीला तुम्ही विसरू नका असे भावपूर्ण उद्गार अमरावतीचे प्रा. श्रीकृष्ण बनसोड यांनी काढले.ते माळी कर्मचारी सेवा मंडळ कारंजा आयोजित गुणवंत सत्कार सोहळ्यात अध्यक्ष म्हणून बोलत होते.
स्थानिक कारंजा नागरी पतसंस्था सभागृहात माळी समाज गुणवंत सत्कार सोहळा दि.१४ ऑगस्ट रोजी संपन्न झाला.
यावेळी प्रमुख कृषी शास्त्रज्ञ एन.आर . होले, माजी लेखाधिकारी वसंत भडके ,कारंजा पंचायत समिती उपसभापती किशोर ढाकुलकार,जि. प .सदस्य मीनाताई भोने,पंचायत समिती सदस्य विशाल घोडे,अकोला शिक्षक पतसंस्थेचे संचालक प्रमोद काळपांडे,निलेश काळे,सुरेश बंड,मंडळाचे जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण बोळे ,आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी संघटनेचे दिवंगत पत्रकार दिगंबर काळेकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
मंडळातर्फे अध्यक्ष तथा प्रमुख पाहुणे यांचे स्वागत तथा सत्कार करण्यात आला.
संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण बोळे यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी मान्यवरांचे हस्ते माळी समाजातील दहावी ,बारावी तसेच शिष्यवृत्ती आणि क्रीडा क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, प्रमाणपत्र,तथा फाइल व गौरवचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ललित टूटयोरियल अकोला चे वतीने प्रत्येक विद्यार्थ्यांस एक स्कूल बॅग देण्यात आली.
क्रीडा क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेल्या गौरी दिलीप तायडे हिने राष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धा बंगलोर येथे महाराष्ट्र संघात सहभागी होऊन उत्कृष्ठ प्रदर्शन केल्याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला.एम. बी. बी. एस. ला नंबर लागल्याबद्दल अजिंक्य सुभाष घोडे याचा,
आपात्कालीन संकटांना सामोरे जाऊन समाजाची सेवा करणाऱ्या इंझोरी येथील अजय ढोक तसेच यूट्यूब कलावंत सुरेश राऊत यांनी आपल्या वऱ्हाडी भाषेतून विनोदी व्हिडिओ निर्माण करून भारतीय व विदेशातील प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतल्याने संघटनेतर्फे त्यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला.
यावेळी वर्ग १० वीतील कु.देविका विनय बोळे, कु.गायत्री कैलास सोनूले,कु.पायल घनश्याम खरीपकर,कु .वैष्णवी गजानन काठोळे,कु.मीनाक्षी गजानन हळदे यांच्यासह इतर विद्यार्थ्यांचा तसेच वर्ग १२ वी तील कु.कृष्णाली वासनकर,अर्पित राऊत,कु.जगन्नाथ बंगाळे,गायत्री सुभाष हळदे यांच्यासह इतर विद्यार्थ्यांचा तसेच वर्ग ८ वी च्या शिष्यवृत्ती परीक्षेत उत्कृष्ट यश मिळवल्याबद्दल कु.पूर्वा तायडे हिचा तसेच इतर सर्व विद्यार्थ्यांचा अध्यक्ष तथा प्रमुख पाहुणे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी अनेक वक्त्यांची मार्गदर्शनपर भाषण झाली .
कृषी शास्त्रज्ञ प्रा. होले म्हणाले की, आज स्पर्धा वाढली आहे या स्पर्धेत तुमच्या चिकाटी व जिद्दीला महत्त्व आहे .यश हे श्रीमंत व गरीब यामध्ये भेद करीत नाही ,प्रयत्न करणाऱ्यांना यश मिळते म्हणून प्रयत्नवादी बना !असे आवाहन त्यांनी केले
..तर प्रमोद काळपांडे म्हणाले की ,विद्यार्थ्यांनी स्वतः नोकर बनण्यापेक्षा इतरांना नोकरी देण्याची महत्त्वकांक्षा बाळगावी त्यासाठी व्यवसायाची कास धरावी,ज्या क्षेत्रात जाऊ त्या क्षेत्रात उत्कृष्टतेची कास धरावी.
यावेळी सुरेश राऊत ,अजय ढोक, सौ.मीनाताई भोने,आदी वक्तांची भाषणे झाली .संघटनेने समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना दत्तक योजना सुरू केली अशा विद्यार्थ्यांना दत्तक योजनेअंतर्गत सहाय्य केले जाते. यावेळी गरजु विद्यार्थ्यांना य आर्थिक सहाय्य करण्यात आले. कार्यक्रमाकरिता बाहेरगावावरून बहुसंख्येने पालक व विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.
कार्यक्रमाचे संचालनअनुप डहाके यांनी तर केले तर आभार प्रदर्शन हेमंत पापळे यांनी केले .कार्यक्रमाच्या यशस्वीची साठी माळी कर्मचारी संघटनेच्या मधुकरराव इंगळे,परमेश्वर व्यवहारे,विवेक वासनकर,महेंद्र धनस्कर,योगेश्वर शामसुंदर, विशाल वैद्य,राजेंद्र शामसुंदर,उमेश ढगे,कुणाल पापळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले...
आपल्या प्रतिक्रिया द्या....