एक गाव एक गणपती नुसार रामपूर चक येथे बाल गणेश मंडळ रामपूर चक येथे गणेश मूर्तीची स्थापने पासून विसर्जन पर्यंत नवनवीन समाज प्रबोधनाचे कार्यक्रम करण्यात बाल गणेश मंडळ अग्रेसर आहे.
यावर्षीही शिक्षकी पेशा सांभाळून भारुडच्या माध्यमातून समाजातील कुप्रथा,अनिष्ठ चालीरीती वर आधारीत समाज प्रबोधन करणारे चेतन ठाकरे यांनी यावर्षी फुलाबाईची भूमिका साकारून समाज प्रबोधन केले.
भगवंतराव हिंदी हायस्कूल गडचिरोली येथे शिक्षक म्हणून कार्यरत असणारे श्री.चेतन मारोतराव ठाकरे हे शिक्षकी पेशासोबतच समाजसेवेची आवड असल्याने "भारुड" या कार्यक्रमाच्या माध्यमातून दारुबंदी, अंधश्रद्धा निर्मुलन, मुली वाचवा मुली शिकवा, स्वच्छता अभियान,वृक्षारोपण, हनजलसंर्वधन, अध्यात्म आणि विज्ञान, हागणदारी मुक्त गाव , संत आणि महापुरुषांचे विचार यासारख्या अनेक विषयावर खेडयापाडयात तसेच शहरी भागातही विनोदी ढंगातून प्रबोधनाचे कार्य करतात.
आतापर्यंत 410 प्रयोग झालेले आहेत. मात्र त्यासाठी शाळेतून सुट्टी न घेता फावल्या वेळेचा सदुपयोग करुन हि सेवा सुरु आहे.आणि जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत हे कार्य निरंतर सुरु ठेवणार आहेत असे सांगितले
जवळपास 52 लोकांनी कार्यक्रमातून बोध घेऊन दारू सोडलेली आहे. ब-याचशा महिलांनी खऱ्याचे व्यसन सोडलेले आहेत.