वणी कडे वंधली , माढेळी व सोईट मार्गे जाणाऱ्या कोळशाचा ट्रक व आटो मध्ये काल रात्री 8:00 वाजताच्या सुमारास अपघात झाला असून सदर अपघातात ऑटो मधील प्रवाशी जखमी झाले. त्यापैकी एक तरुण गंभीर रित्या जखमी झाल्याची घटना घडली.सदर ट्रक चा चालक पसार झाला असल्याने गावकऱ्यांमध्ये संतापा ची लाट पसरली आहे.
मागील दोन महिन्यापासून वणी व चंद्रपूर येथील कोळसा साईड वर जाणाऱ्या हजारो टन कोळशाची वाहतूक एकोना खाणीतून सुरू आहे. सदर वाहतूक वरोरा ते माढेळी व सोईट मार्गे वणी येथे होत आहे.
आधीच वरोरा ते माढेळी रोड इतका खराब झाला असताना त्याच रोड वरून कोळशाची अवजड वाहतूक सुरू आहेत त्यामुळे रस्ता पूर्णतः खराब झाला आहे. त्यामुळे रस्तावरून आवागमन करणे येथील सर्वसामान्य लोकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे.तसेच माढेळी ते खैरी रोड नव्यानेच तयार झाला असतांना तो सुद्धा ओव्हरलोड ने खराब होत आहे.
काल कोळसा खदान येथून निघालेली ट्रक वणी कडे कोळसा भरून जात होता वर्धा नदी पुला अलीकडे सोईट कडे जाणारा आटो ला धडक दिल्याने तरुण गंभीररित्या जखमी झाला व त्याला उपचारार्थ चंद्रपूर येथे नेण्यात आली असल्याचे कळते. सुदैवाने काही प्रवाशी बचावले.
अशाच प्रकारे ह्या रोडवर हा दुसरा अपघात असून यापूर्वी एकोना येथील महिला गंभीर जखमी झाली होती तसेच पूर्वी वाहतुकीने बरेच अपघात झाले असताना वाहतुक बंद झाली नाही व बळजबरीने खुले आम अवजड कोळसा वाहतूक सुरू आहे. वाहतूक बंद करण्यासंदर्भात संबंधित गावच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम , एसडीएम व पोलिसांना निवेदन दिले परंतु कोणताही फरक न पडता सतत या रस्त्यावर वाहतूक सुरू असून अपघात सुद्धा वाढत असतांना सतत दूर्लक्ष केल्या जात आहे.
पोलीस विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित गावातील लोकप्रतिनिधी सद्या डोळ्यावर पट्टी बांधून बघ्याची भूमिका घेत असल्याचा संशय गावकऱ्यांना होत आहे . त्यामुळे या भागातील लोकांमध्ये या प्रशासना विरोधात मोठा रोष वाढत चालला असून आज झालेल्या अपघातातील ट्रक चे गावकऱ्यांनी नासधूस करून वाहतूक बंद करण्याचा निर्णय वंधली, माढेळी व सोईट तसेच कोसारा येथील ग्रामस्थांनी ठरविले असल्याचे समजते.