नागपूर : प्रजासत्ताक दिन हा मानव मुक्ती चा दिवस आहे.या दिवशी संविधान लागु होऊन प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र जगण्याच्या अधिकार प्राप्त झाला आहे.भारतीयराज्यघटने बाबत जागरूकता,संविधानाचे मुळ्ये प्रत्येक नागरिकाला माहिती व्हावे यासाठी "घर घर संविधान" हा उपक्रम राबविण्यात येत आहे.मदत सामाजिक संस्था नागपूर तर्फे आज संविधानाचे अमृतमहोत्सव निमित्त पंचाहत्तर पुस्तके वाटण्यात आली.
मागिल दहा वर्षांपासून प्रत्येक वर्षी शंभर भारत का संविधान हे पुस्तक वाचण्याचा उपक्रम सुरु आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मदत सामाजिक संस्था नागपूर चे संस्थापक सचिव दिनेश वाघमारे होते.प्रमुख पाहुणे दै.बहुजन सौरभचे कार्यकारी संपादक विलास गजभिये,
माजी नगरसेवक मनोज गावंडे होते.कारयकरमाचे संचालन सचिन देशभ्रतार,प्रास्ताविक अरुण फुलझेले,आभार श्रीमती रेखाताई थुल यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी रवी सहारे, धर्मेंद्र गणबाजी धनविजय,भगवान सारे यांनी केले.