अंगावर वीज पडून महिलेचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना आज दिनांक:- २९/०८/२०२४ दुपारच्या सुमारास घडली .
लताबाई बंडू चटारे वय ६२ रा. भेजगाव ता. मुल जिल्हा चंद्रपूर असे मृतक महिलेचे नाव आहे.
लताबाई बंडू चटारे ही महिला एकटीच शेतामध्ये काम करण्यासाठी गेली होती . अचानक विजांचा कडकडाट सुरु झाला आणि या कडकडाटा पासून बचाव करण्यासाठी एका झाडाचा आसरा घेतला मात्र नियतीला ते मान्य नव्हते.आणि दुपारचे २ :०० वाजताच्या सुमारास नियतीने क्रूर डाव खेळला आणि लताबाई च्या अंगावर विज कोसळली आणि तिचा मृत्यू झाला.दुर्घटने बाबत भेजगाव गावात माहिती कळताच गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. उपजिल्हा रुग्णालयात पार्थिव शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे.