तालुक्यातील पारडगांव – सोनेगांव रोड मागील ४ वर्षापासून पुर्णपणे उध्वस्त झालेला आहे त्यामूळे या रोडचे मजबुतीकरण व डांबरीकरण करुन पारडगांव – सोनेगांव रोडने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या सोयीचा व्हावा तसेच पारडगांव येथील शेतकऱ्यांना शेतावर येणे – जाणे करण्यास उपयोगी व्हावा या एकमेव उद्देशाने अनेकदा पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना व संबंधीतांकडे लेखी अर्जद्वारे कळविले तसेच प्रसिध्दी माध्यमातून लक्ष वेधले मात्र अजुनपर्यंत या रोडचे काम सुरु झाले नाही. त्यामुळे पालकमंत्री विजय वडेट्टीवार आपण या लेखी अर्जाची तात्काळ दखल घ्यावी व हा रोड येत्या १५ दिवसात सुरु करावे, अन्यथा काम पुर्ण न झाल्यास नामदेव थेंगरी हे स्वतः हनुमान मंदिर पारडगांव परिसरातील पारडगांव – सोनेगांव रोडवर आमरण उपोषणास बसणार असून त्यांना जिवीतहानी झाल्यास सर्वस्वी पालकमंत्री विजय वडेट्टीवार हेच जवाबदार राहतील असा इशारा नामदेव ठेंगरी यांनी विजय वडेट्टीवार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.