कारंजा : दिनांक 07.09.2022 रोजी ग्राम केरहाळा ता. सिल्लोड जि. औरंगाबाद येथे गाडीलोहार, घिसाडी समाजाचे लोहारी काम करणारे स्व. सर्जेराव भिका पवार यांना विळा खरेदीचे कारणावरून आरोपी गणेश पांढरे यांनी बेदम मारहाण केल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सदर घटनेच्या निषेधार्थ आज दिनांक 16 सप्टेंबर 2022 रोजी 01.30 वा. मा.मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य यांना मा. जिल्हाधिकारी अकोला यांचे मार्फतीने निवेदन देण्यात आले. निवेदनामध्ये स्व.सर्जेराव पवार यांचे परिवाराला शासनाकडून 05 लाख रुपयाची आर्थिक मदत द्यावी व आरोपी विरुद्ध कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. निवेदन देताना चित्रकथी समाजाचे सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक राजूभाऊ अवताडे, अध्यक्ष चित्रकथी समाज संघटना वाशिम जिल्हा सरपंच सचिन एकनार, जगदीश भोजने, लखन अवताडे, सुमंत मनीजी भांडे, प्रवीण भांडे व नाथ जोगी समाजाचे राहुलभाऊ इंगळे अध्यक्ष युवा नाथ जोगी समाज महाराष्ट्र सेवानिवृत्त राखीव पोलीस निरीक्षक गजाननराव इंगळे ऍड. राजूभाऊ कासार, श्रीमती राखीताई तिहीले गाडीलोहार समाजाचे भाऊराव पवार, प्रवीण पवार इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. सदर निवेदनाची प्रत मेलद्वारे मा. मुख्यमंत्री महोदयांना पाठविण्यात आली आहे. वरील मागण्या शासनाने पूर्ण नाही केल्यास शासनाचे विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे.