अवैधरित्या गांजांची तस्करी होत असल्याच्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेने 27 मे रोजी रात्रीच्या सुमारास इंदिरानगर येथील वनउपज तपासणी नाक्यावर सापळा रचून 99 हजार 690 रुपये किंमती गांजा, 6 लाख किंमतीचे चारचाकी वाहन तसेच 20 हजाराचे मोबाईल असा 7 लाख 99 हजार 690 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी आशिष धनराज कुळमेथे (28) रा. संजयनगर जि. चंद्रपूर, धनराज मधुकर मेश्रा (33) रा. नेहरूनगर जि. चंद्रपूर, ज्योती श्रीकृष्ण परचाके (22) रा. शास्त्रीनगर जि. चंद्रपूर असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.अवैधरित्या गांजाची तस्करी होत ganja seized असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला प्राप्त झाली. त्यावरून पोलिसांनी इंदिरानगर येथील वनउपज तपासणी नाक्यावर रात्रीच्या सुमारास सापळा रचला असता, एमएच 34 बीआर 4086 या क्रमांचे वाहन संशायास्पद आढळून आले. पोलिसांनी वाहनाला थांबवून पंचासमक्ष तपासणी केली असता वाहनाच्या डिक्कीत 99 हजार 690 रूपयाचा 6. 646 किलो ग्रॅम गांजा आढळून आला. तसेच 6 लाख रुपये किंमतीचे चारचाकी वाहन, 20 हजार रुपये किंमतीचे मोबाईल असा एकूण 7 लाख 11 हजार 690 रूपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला. आरोपीविरुद्ध गडचिरोली पोलिस ठाण्यात गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ नियम (एन. डी. पी. एस) अन्वये गुन्हा नोंदकरण्यात आला. अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिन्ही आरोपींना 31 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास गडचिरोली पोलिस ठाण्याच्या महिला पोलिस उपनिरीक्षक संघमित्रा बांबोळे करीत आहेत. सदर कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. उल्हास भुसारी यांचे नेतृत्वातमसपोनि रुपाली पाटील, पोहवा नरेश सहारे, हेमंत गेडाम, पोना सतीश कत्तीवार, राकेश सोनटक्के, पोशि उमेश जगदाळे, सचिन घुबडे आदींनी केली.