कारंजा : शहर पोलीस स्टेशन कारंजाचे कर्तव्यतत्पर पोलीस निरीक्षक दिनेशचंद्र शुक्ला यांनी आपल्या आजवरच्या कार्यकालात अनेक गुन्ह्याचा तातडीने व योग्य तपास करून गुन्हेगारी क्षेत्रावर नियंत्रण मिळवून वचक ठेवला आहे. व शहरात शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यात ते यशस्वी ठरले आहे. दिनेशचंद्र शुक्ला हे जेवढे कठोर, शिस्तप्रिय आहेत. तेवढेच ते सुस्वभावी,हास्यमुख व मनमिळाऊ देखील आहेत. प्रेमाने आणि समुपदेशनाने सुद्धा गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविता येते हे त्यांनी सिद्ध करून दाखवीले.त्यामुळे कारंजा शहरात त्यांचे विषयी आदराचे व सन्मानाचे स्थान निर्माण झाले आहे.याचा प्रत्यय नुकताच कारंजेकरांनी अनुभवला. याविषयी अधिक वृत्त असे की, नुकताच त्यांचा वाढदिवस साजरा झाला. त्यांचा वाढदिवस असल्याची माहिती मिळताच शहरातील सर्वच क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विशेष म्हणजे पत्रकार मंडळीनी त्यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सायंकाळी विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष संजय कडोळे,अ भा मराठी नाट्य परिषदेचे सदस्य तथा भिलामाता संस्थानचे अध्यक्ष शाहिर देवमन मोरे, संत गजानन महाराज मंदिर संस्थानचे सेवाधारी सुरेराराव ठाकरे गुरुजी, युवा पत्रकार समिर देशपांडे, प्रतिक हांडे आदींनी पुष्पगुच्छ देवून पेढे भरवीत आभिनंदन केले.