अकोला: स्थानिक *दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या स्वर-काव्य महोत्सवात २८ मे २०२३ रोजी काव्यगंध हा कवितासंग्रह अभिनेत्री इरावती लागू व संगीतकार कौशल इनामदार यांच्या शुभहस्ते प्रकाशित करण्यात आला*. संपूर्ण भारतातून आलेले दिव्यांग व सर्व सामान्य कवी काव्य महोत्सवात सहभागी होते. *प्रकाशन सोहळ्यात काव्यगंध च्या आवेष्टन केलेल्या प्रति सजवलेल्या पालखीतून अद्विका जाधव या चिमुकलीने मंचावरील उपस्थित मान्यवरांना सुपूर्त केल्या. टाळ्या , ढोलाच्या गजरात व तुतारीच्या निनादात काव्यगंध या ISBN ९७८-९३-५८९१-०६३-६ प्राप्त कविता संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले*. या काव्य संग्रहात संपूर्ण भारतातील कवींच्या कवितांचा समावेश असून संपादक व प्रकाशक म्हणून संस्थापक अध्यक्ष प्रा. विशाल कोरडे यांनी कार्य केले. अभिनेत्री लागू यांनी हा कवितासंग्रह दिव्यांगांना समर्पित केला. या संग्रहातून मिळणारा निधी दिव्यांग शिक्षणासाठी संस्थेतर्फे उपयोगात आणल्या जाणार असल्याने रसिक वाचकांनी हा कवितासंग्रह खरेदी करून एक हात सहकार्याचा द्यावा असे आवाहन अभिनेत्री इरावती लागू यांनी केले.*संपूर्ण भारतातून आलेल्या दिव्यांग कवींपैकी आकाश देशमुख, जनार्दन जामनिक, मुकेश वानखेडे, ज्ञानेश्वर वर्हाडे तर सामान्य कवींपैकी जगदीश ढोरे, प्रतिभा कळंब, नारायण अंधारे, सारिका अयाचित, किरण वकारे,प्रांजल रायपुरे, निवेदिता राजूस्कर, तेजपाल इंगळे,शुभम राठोड, चंद्रशेखर हिरे व नेहा राजपूत यांच्या कवितांना रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.* काव्यगंध हा काव्यसंग्रह मिळविण्यासाठी संस्थेच्या हेल्पलाइन ९४२३६५००९० क्रमांकावर संपर्क साधावा असे आव्हान संगीतकार कौशल इनामदार यांनी कार्यक्रमाच्या शेवटी केले.