कारंजा (लाड) : येथून जवळच असलेल्या,श्रीक्षेत्र शेलूवाडा येथील श्री चवऱ्या महादेव संस्थान शेलूवाडा येथील स्थानिक ग्रामस्थ,शिवभक्त,वारकरी मंडळी आणि आदर्श जय भारत सेवाभावी संस्था कोळी कारंजाचे सौजन्याने ग्राम शेलूवाडा ते श्रीक्षेत्र शेगाव पर्यंत श्रीरामनवमी निमित्त पायी दिंडी सोहळा संपन्न झाला असून यावेळी श्रीमती पार्वताबाई शिंदे,जंगले,सरस्वतीबाई कांबळे, चंद्रकलाबाई,रुक्माबाई लोखंडे, विमलाबाई लोखंडे,गिताबाई लोखंडे,सुनिताबाई लोखंडे, जिजाबाई मस्के,शिलाबाई काळे, मिनाबाई शिंदे,शशिकलाबाई काकड,मैनाबाई मस्के, बहिणाबाई मस्के,बेबी मस्के , तुळसाबाई मस्के,कांताबाई कसळकर,शांताबाई गरड, सुनीताबाई मस्के , ताईबाई नेतनकर,चंद्रकलाताई मस्के, देवकलाबाई मोडक ,वर्षाताई मस्के,कामिनाबाई देवकर, बेबीताई शेळके,निर्मलाबाई पवार , प्रमिलाताई जिरे,हभप रामदास महाराज मस्के,प्रकाश महाराज मस्के,नितीन मोडक, शिवभक्त डॉ ज्ञानेश्वर गरड इत्यादी वारकरी दिंडी मध्ये सहभागी झाले होते.

गण गण गणात बोतेच्या गजरामध्ये आणि श्री संत गजानन महाराजाच्या भजनाचे सप्तसुरात दिंडीचे श्रीक्षेत्र शेगाव येथे आगमन झाले. यावेळी श्री गजानन नगरीची प्रदक्षिणा करून भाविकांनी संत श्री गजानन महाराज समाधी मंदिर, प्रकटस्थळ व इतर स्थळांचे दर्शन घेतले.
श्री संत गजानन महाराज संस्थान तर्फे दिंडी प्रमुख आणि सर्वच वारकरी मंडळीचे सहर्ष स्वागत करण्यात आले. सदर्हू पालखी सोहळा यशस्वी पार पाडण्याकरीता, सात्विक व सेवाभावी असलेले डॉ ज्ञानेश्वर गरड यांचे मोलाचे सहकार्य मिळाले असल्याचे गावकरी वारकरी मंडळी यांनी सांगीतले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....