कारंजा - प्रादेशिक विद्या प्राधिकरण, नागपूर म्हणजेच राज्य विज्ञान व गणित शिक्षण संस्था, रवी नगर, नागपूर येथील नवनियुक्त संचालिका डॉ . हर्षलता बुराडे यांचा विदर्भ विज्ञान अध्यापक मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्या तर्फे दोन जून रोजी सत्कार करण्यात आला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक दोन जून 2024 रोजी दुपारी एक वाजता प्रादेशिक विद्या प्राधिकरण राज्य विज्ञान व गणित शिक्षण संस्था, रविनगर नागपूर येथील सभागृहात राज्य विज्ञान व गणित शिक्षण संस्थेच्या संचालिका डॉ.हर्षलता बुराडे यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विदर्भ विज्ञान अध्यापक मंडळा तर्फे सत्कार करण्यात आला.
संचालिका डॉ. हर्षलता बुराडे यांनी दिनांक 29 मे रोजी नागपूर येथील राज्य विज्ञान व गणित संस्थेमध्ये संचालक म्हणून नियुक्ती झाली. त्यापूर्वी त्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नागपूर येथे प्राचार्य म्हणून कार्यरत होत्या. डॉ. हर्षलता बुराडे यांचे संचालक पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम विदर्भ विज्ञान अध्यापक मंडळाच्या तर्फे आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून संचालिका हर्षलता बुराडे, डॉ. राजकुमार अवसारे, विज्ञान पर्यवेक्षक राजु नेब आणि विदर्भ विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र भास्कर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविकात डॉ. रवींद्र भास्कर यांनी विज्ञान विदर्भ विज्ञान अध्यापक मंडळाच्या कार्याबद्दल माहिती दिली.
त्यानंतर विदर्भ विज्ञान अध्यापक मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी राज्य विज्ञान व गणित शिक्षण संस्थेच्या संचालिका डॉ. हर्षलता बुराडे, अधीव्याख्याता डॉ. राजकुमार अवसारे व विज्ञान पर्यवेक्षक राजु नेब यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. यानंतर राजु नेब व डॉ. राजकुमार अवसारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात संचालिका डॉ.हर्षलता बुराडे यांनी येत्या शैक्षणिक वर्षात राज्यभर विज्ञानाचे उपक्रम प्रभावीपणे राबवण्यासाठी आपण सहकार्य करावे,अशी अपेक्षा व्यक्त करून, सत्कार केल्याबद्दल विदर्भ विज्ञान अध्यापक मंडळाचे आभार मानले. सदर कार्यक्रमाचे संचालन विदर्भ विज्ञान अध्यापक मंडळाचे सचिव विजय भड यांनी तर कार्याध्यक्ष प्रमोद सेलोकर यांनी आभार मानले. यावेळी विदर्भ विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र भास्कर, सचिव विजय भड, कार्याध्यक्ष प्रमोद शेलोकार, उपाध्यक्ष अजय भोयर व मनोज रंहागडाले, सहसचिव आशिष आरीकर, चारुदत्त गावंडे, हेमराज बिसेन, अनंत डूमरे, प्रसिद्धी प्रमुख प्रमोद जोशी सदस्य विलास येंडे, तसेच विज्ञान शिक्षक डॉ. प्रवीण क्षिरसागर, ओरा चक्रे, गोपाल सूर्यवंशी, ललित भुरे, आशा ताडे उपस्थित होते.
आपल्या प्रतिक्रिया द्या....