वाशीम : महाराष्ट्र राज्य समाजकल्याण विभागामार्फत रमाई आवास योजना सन 2023 -24 या वर्षा करिता शासनाने मातंग समाजासाठी जिल्हा निहाय शहरी आणि ग्रामीण भागासाठी जास्तिजास्त प्रमाण दिले आहे.वाशीम जिल्ह्यासाठी 625 ची मर्यादा असून दि 3 नोहेंबर 2023 पर्यंत फक्त 100 अर्ज आल्याचे सूत्रांनी सांगितले. तरी सर्व समाज बांधव ,विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी,कार्यकर्ते,विविध पक्षाचे कार्यकर्ते यांनी मातंग समाज बांधवांपर्यंत जाऊन त्यांना या रमाई घरकुल योजनेची इत्यंभुत माहिती देऊन त्यांना सहकार्य करावे.
सदरील योजनेचे अर्ज पंचायत समिती कार्यालयातील घरकुल विभाग किंवा बांधकाम विभागात देण्यात यावे. या योजनेसाठी जातीचा दाखला असणे जरुरीचे आहे. तसेच शहरी भागासाठी ,नगर परिषद, किंवा महानगरपालिका,नगर पंचायत या ठिकाणी अर्ज दाखल करून अर्ज देल्याची पोच घ्यावी.
रमाई आवास योजना ही संपूर्ण महाराष्ट्र राज्यात राबविण्यात येत असून महाराष्ट्रातील ग्रामीण भागासाठी 23591व महानगरासाठी 1467 तर नगर पालिका व नगर पंचायत साठी 2891 टारगेट असून ऐकून ग्रामीण शहरी 27949 येवढे टार्गेट शासनाने दिले आहे . समाज बांधवांना विनंती करण्यात येते की त्यांनी त्वरित अर्ज सादर करावे.असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग वाशीमचे जिल्हाध्यक्ष डॉ रमेश चंदनशिव यांनी केले आहे.