जाफराबाद:- जाफराबाद तालुक्यातील भारज बु. येथील रविवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास अवकाळी पावसामुळे पानमळ्याचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे...
त्याचप्रमाणे वेलीचे पान पूर्णपणे उद्धवस्त झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच मिरची टमाटो, मका गहु कापूस तूर पीक ही आडवे झाले आहे.
या परिसरात यावर्षी खरिपात सोयाबीन पीकामध्ये पावसाअभावी मोठ्या प्रमाणात घट आली आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्याची रब्बी पिकावर आशा होती. मात्र रविवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे मका गहु कांदा कापुस, भाजीपाला पिकासह फळबागांनाहि मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. भारज बु. येथील बारी समाजाचा प्रमुख व्यवसाय पानमळाच आहे. परंतु अवकाळी पावसाने पान मळ्यांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे.
त्याचप्रमाणे पानवेली ह्या काडयावर उभ्या केलेल्या असतात वादळी पावसाने त्या जमिनीवर आडव्या झाल्या आहेत. या भागात जवळपास 150 पानमळ्याचे वादळी पावसाने नुकसान झाले आहे. तरी प्रशासनाने नुकसान झालेल्या पान मळ्याचे लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.