महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या विद्यापीठ हायस्कूल प्रशालेतील दहावीच्या विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. प्रशालेचा दहावीचा निकाल 99.21 टक्के लागला.
1) प्रथम - मयुरी शेजुळ 89.60 टक्के.
2) द्वितीय - कार्तिकी मोडेकर 89.40 टक्के
3) तृतीय - दीक्षा मुठा 89.20 टक्के
यशस्वी विद्यार्थी , मार्गदर्शक शिक्षक, पालक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे संस्थेचे कार्याध्यक्ष रवींद्र देव, सचिव डॉ. पी.व्ही.एस.शास्त्री, शाला समिती अध्यक्षा सीमा कांबळे, मुख्याध्यापक विष्णू मोरे यांनी विशेष अभिनंदन केले. विद्यार्थ्यांचे कौतुक करत पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.