अमरावती : अंबानगरी अमरावती येथील अंबादेवी संस्थान रुक्मिणीनगर येथे आपल्या गोंधळ जागरण कार्यक्रमा मधून समाजप्रबोधन करीत असतांना जय भवानी जय मल्हार गोंधळी कला मंचाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त संजय कडोळे यांनी गोंधळ जागरण कार्यक्रम सादर करीत असतांना आपल्या समाज प्रबोधना मधून सांगीतले की, "पाण्यावर उठणारा बुडबूडा ज्याप्रमाणे क्षणीक असतो. लाजाळू वनस्पती जेवढी नाजूक असते त्यापेक्षा कितीतरी नाजूक असे आपले मानवी जीवन आहे. या क्षणाला आपण जीवंत आहो. पुढील क्षणाला आपला मृत्यु कसा ओढवेल सांगताच येणार नाही.आपण विश्वाचे पाहूणे आहोत.एक दिवस हे जग सोडून जायचे आहे.त्यामुळे जीवन जगत असतांना येथील काहीच आपले नाही.याचे नेहमी भान ठेवा.सत्य,अहिंसा,न्याय,स्नेह आणि श्रध्दा ही पंचसुत्री ठेवून जीवन जगा.जीवन हे नश्वर असून बुडबुड्या प्रमाणे क्षणीक आहे. ही गोष्ट आपल्या हृदयात आणि मेंदूत ठेवून आपले आयुष्य केवळ आणि केवळ मानवी सेवेतच खर्ची घाला व मानवसेवेतून जास्तीत जास्त पुण्य मिळवा. तुमचा उद्धार झाल्या शिवाय राहणार नाही.मृत्युनंतर जग तुमच्यासाठी रडेल. तुमचा नावलौकिक म्हणजेच किर्ती वाढेल." असे प्रबोधन त्यांनी केले. लोककलावंत संजय कडोळे यांनी पुढे बोलतांना सांगीतले "आजचा मनुष्य केवळ धनदौलत,शेती भूखंड कमविण्यात आयुष्य बर्बाद करतो.भाऊबंद आणि मित्रमंडळी समोर मिथ्या फुशारक्या करीत नेहमी लाखो करोडोच्या गोष्टी करतो. स्वस्वार्थासाठी क्षणोक्षणी खोटे बोलून,समोरच्याचा फक्त विश्वासघातच करतो.परंतु भ्रष्टाचाराच्या कमाईमुळे स्वतः सोबत संपूर्ण कुटुंबाला रोगराई, भ्रष्टचार व बदनामीच्या नरकात लोटतो.मृत्युनंतर सर्व वैभव येथेच राहते.त्याला वारसदार रहात नाही मग कधी कधी तर भ्रष्टाचाराची ही संपत्ती अखेर दुरच्या तिसऱ्याच सोयऱ्याकडे जाते किंवा सरकार जमा होते.म्हणून माणसाने आयुष्यात स्वतःच्या किंवा कुटुंबाच्या भल्याकरीता केवळ निःस्वार्थ मानवसेवा करून आत्मोद्धार करून घेतला पाहिजे.असे त्यांनी सांगितले. संजय कडोळे यांच्या कार्यक्रमाला साथ संगत संबळ वादक-गोपाल मुदगल,मृदंगवादक-हभप.अजाब महाराज ढळे,हार्मोनिअम-हभप लोमेश पाटील चौधरी, तुणतुणे-कमलेश कडोळे,टाळ- हभप माणिक महाराज हांडे, गीते व नृत्यकला -कांताबाई लोखंडे, इंदिराबाई मात्रे यांनी दिली. कार्यक्रमाला फार मोठ्या जनसमुदायाची गर्दी होती.