वाशिम - सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी पात्र असलेली सेट म्हणजेच राज्यस्तरीय पात्रता परिक्षा येथील नालंदानगरातील रहिवासी प्रा. अॅड. मुकुंद वानखेडे यांचे सुपुत्र प्रतिक वानखेडे यांनी पहिल्या प्रयत्नातच उत्तीर्ण करुन घवघवीत यश संपादन केले आहे. सावित्रीबाई फुले पूणे विद्यापीठव्दारे घेण्यात आलेल्या ३९ व्या सेट या पात्रता परिक्षेचा निकाल लागला असून प्रतिक वानखेडे हा पात्र ठरला आहे. सेट ही परिक्षा सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी अत्यंत कठीण समजली जात आहे. ही परिक्षा ७ एप्रिल रोजी घेण्यात आली होती. प्रतिक वानखेडे यांनी त्यांचे एमएसस्सी झुऑलॉजीचे शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून पूर्ण केले. विशेष म्हणजे त्यांनी पहिल्या प्रयत्नातच सेट परिक्षा उत्तीर्ण केली आहे. या यशामुळे प्रतिकवर कौतूकाचा वर्षाव होत आहे.