कारंजा (वाशिम जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) वाशिम जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीच्या पावसाने सर्वात जास्त बाधित असलेल्या कारंजा तालुक्यातील बळीराजा अतिवृष्टिने हवालदिल असतांना, बळीराजाला तात्काळ आर्थिक मदत देऊन दिलासा देणे गरजेचे आहे.जिल्ह्यात आधीच पाऊस उशिरा सुरु झाल्याने, नुकत्याच पेरण्या करून, येणाऱ्या पिकाच्या भरवशावर भविष्याची स्वप्ने रंगविणाऱ्या शेतकर्यावर, चालू आठवड्यातील ढगफुटी सदृश्य पावसामुळे आस्मानी संकटच कोसळले परिसरातील पोहा, काजळेश्वर,धनज, कामरगाव, उंबर्डा बाजार, मनभा,खडी धामणी अशा सर्वच मंडलातील खेडेपाड्यावरील शेतकऱ्यांच्या शेतजमीनी आजू बाजूच्या,नदी नाल्यांमुळे खरडून गेल्या . काहींच्या शेतीचे रूपांतर तर तलावातच झाले. सध्या महसूल विभागाकडून नुकसानग्रस्त शेतजमीनिच्या पंचनाम्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.मात्र चालू पावसाळी अधिवेशनामध्ये कारंजा मानोरा विधासभा मतदार संघातील प्रश्न अग्रक्रमाने मांडून,अतिवृष्टिने बाधीत शेतकऱ्यांना तात्काळ अर्थसहाय्य मिळेल काय ? आणि कृषीमंत्री ना.धनंजय मुंडे तसेच उपमुख्यमंत्री ना.देवेन्द्र फडणवीस स्वतः कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघातील शेतकर्यांच्या बांधावर येऊन त्यांचे अश्रू पुसून त्यांना लगेच सरसकट नुकसान भरपाई देणार काय ? याकडे कारंजेकरांचे लक्ष्य लागले आहे.