मानोरा/कारंजा/वाशिम: प्रिय मतदार राजा,सप्रेम नमस्कार. सर्वप्रथम समस्त मतदार बंधू भगिनी यांना रविवार दि.१६ एप्रिल रोजी,होणाऱ्या, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नियामक मंडळ निवडणूकीकरिता शुभेच्छा,आपण सर्व जेष्ठ श्रेष्ठ कलावंत आहात आणि प्रत्येक कलावंत हा समाजाचा आरसा आहे.या निवडणुकीत बरेच जन बरेच व्हिडिओ पाठवत आहे आणि हा प्रकार म्हणजे कलावंतांना आरसा दाखविण्याचा प्रकार आहे,प्रत्येक कलावंत हा सुजाण आहे. त्यांना कुणाला मतदान करायचे याची समज आहे. आजपर्यंत कोणती व्यक्ती कुणाशी कशी वागली ? कोणी कोणाची रस्सीखेच केली ? तिस ते पस्तिस वर्ष अखंड असलेल्या नाट्य परिषद मध्ये आज कलावतांमध्ये जाणीवतेची मशाल आताच का पेटली ?
हा विचार होणे गरजेचे आहे,नाट्य परिषद व कलावंत मानधन याचा तिळमात्र संबंध नसतांना कलावंत मानधन प्रचाराचा मुद्दा कसे काय बनू शकतो ? राजकारणाच्या आखाड्यात घराणेशाहीला विरोध करताय ना? मग कुंडली मारून बसलेल्या स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित करून एकाधिकार ठेवणाऱ्याला अलविदा करण्याची हिच ती वेळ,त्यांना कायम घरी बसविणे हा उद्देश नाहीच. ते सुद्धा आपलेच ! पण त्यांच्यासारख्या चुका पुन्हा घडू नये. म्हणून समज देण्याच्या तत्वावर त्यांना निवडणुकी पुरते हद्दपार करणे गरजेचे आहे.आपण सर्व मान्यवर सुजाण आहात समजदार आहात ही निवडणूक कुंडली मारून बसलेले प्रस्थापिता विरुद्ध सामान्य उमेदवार अशीच आहे. तरी आपणास या प्रसिद्धी पत्रकाद्वारे आग्रहाची विनंती (बळजबरी नव्हे) आपण कृपया प्रामाणिक,मनमिळाऊ, निःस्वार्थी उमेद्वार (१) नंदकिशोर अंबादास कव्हळकर तथा (४) उज्वल दत्तात्रय देशमुख यांनाच मतदान करून उपकृत करावे ही आग्रहाची आणि शेवटची विनंती. अशी रंगभूमीवरील आम्हा कलावंताची इच्छा असल्याचे वाशिम, मानोरा, कारंजा येथील नाट्य परिषद मतदारांनी आवाहन केले आहे.