कारंजा (लाड): दि. ३१ मार्च २०२५ रोजी कारंजा (लाड) येथील शेतकरी निवास येथे मा.प्रकाशदादा डहाके स्मृतीप्रित्यर्थ आयोजित "आविष्कार कारंजा नाट्य महोत्सव 2025" चे आयोजन मोठ्या थाटामाटात करण्यात आले होते. याप्रसंगी मराठी सिने नाट्य सृष्टीतील दिग्गज कलाकारांसह स्थानिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.याप्रसंगी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून व्यक्त होतांना, मराठी नाट्यसृष्टीतील विदर्भातील जेष्ठ नाटककार अरुणजी घाटोळ यांनी,कारंजा या ऐतिहासिक कला नगरीतील, "अश्विन जगताप यांच्या अविष्कारचा कल्पवृक्ष दिवसेंदिवस बहरतच राहणार." असल्याचे गौरवोद्गार काढले,पुढे बोलतांना ते म्हणाले की, "आविष्कार प्रतिष्ठानने अल्पावधीतच प्रचंड गरुडझेप घेतली असून आविष्कारचे भवितव्य उज्वल आहे.", अश्विन जगताप याच्या नावाचा उल्लेख करतांना त्यांनी "वन मॅन आर्मी" असे संबोधले,तर झाडीपट्टीचे नाट्यकर्मी तथा सिने अभिनेते विशाल तराळ यांनी, आश्विन जगताप यांची प्रशंसा करतांना, "अश्विन यांना विवाह करीत असलेल्या वधूचा बाप म्हटले,अतिशय दिमाखदार रंगलेल्या या नाट्य महोत्सव मध्ये अध्यक्ष म्हणून अरुणजी घाटोळ तर उदघाटक म्हणून प्रसन्न पळसकर होते. विशेष आकर्षण असलेले विशेष अतिथी, "संत गजानन शेगावीचे" मालिकेमधील दीपक नांदगावकर, स्वामींनी, स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेचे अभिनेते नितेश ललित,सिनेस्टार विशाल तराळ हे उपस्थित होते.तर व्यासपिठावर प्रमुख अतिथी राजेशजी राय, अमोलजी लुलेकर,डॉ.कुंदनजी श्यामसुंदर, देवलालजी बोर्डे, विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजयजी कडोळे,देवेंद्रजी मुकुंद,श्रीमती ललिता ताई माकोडे,सौ शितलताई काकडे,कुणालजी महाजन,संजयजी सांगळे,ज्ञानेश्वरजी खंडारे, माजी नगराध्यक्ष संजयजी काकडे,प्रविनजी साबू,तथा अकोला येथील बरेच मान्यवर व प्रमोदजी गोल्डे,दत्तराजजी दिग्रसकर उपस्थित होते. पहिल्या सत्रात सकाळी १०:०० वाजता कारंजा येथील १६ महिला भजनी मंडळांनी महिला भजन स्पर्धेत सहभागी होऊन आपले भजन सादर केले,त्याचे परीक्षण कारंजा येथील संगीतकार माननिय इहरे सर व रजनीश सर फुकटे यांनी केले, याप्रसंगी आपल्या अमूल्य वेळातून वेळ काढून स्थानिक महिला आमदार मा.सईताई डहाके यांनी आविष्कार कारंजा नाट्य महोत्सवाला भेट देऊन माजी आ.स्व.प्रकाशदादा डहाके याच्या प्रतिमेला हारार्पण करून स्व.श्री.प्रकाशदादा डहाके,याच्या समृत्तिप्रित्यर्थ आयोजित आविष्कार कारंजा नाट्य महोत्सव २०२५ च्याआयोजन बाबत व आविष्कारच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.आविष्कार प्रतिष्ठान तर्फे सिने अभिनेत्री काजल राऊत(अकोला),विशाल तराळ, दीपक नांदगावकर,(अमरावती) नितेश ललित,(यवतमाळ),सरलाताई वावधाने(वर्धा) के संतोषकुमार, अनुप बहाड (अमरावती) सुयश देशपांडे,रौप्य पदक प्राप्त रश्मी धोपे व गाव बोलावतो मराठी चित्रपट निर्माते शंतनू भाके यांना "वैदर्भीय आविष्कार" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले,तसेच कारंजा आविष्कार म्हणून कु.राधिका रामदेवकर,गायत्री गुडधे वैष्णवी गाढवे,श्रद्धा रगडे,श्रीपाद राऊत,यज्ञेश सार्सीकर,निशाली ढाकुलकर,प्रथमेश दिग्रसकर, अनुप राऊत या नाट्य क्षेत्रात भरीव योगदान देत असल्याबद्दल सन्मान करण्यात आला.

जेष्ठ नाटककार मा .अरुण भाऊ घाटोळ यांना "अविष्कार महाराष्ट्राचा" पुरस्काराने गौरावांकित करण्यात आले तसेच कारंज्यात नाट्य चळवळ जिवंत राहावी म्हणून अतिशय तळमळीने भरीव योगदान देणारे वैभव उर्फ आनंद खेडकर यांचा सन्मान तर नाट्य सभागृह करीता आवाज बुलंद करीत असलेल्या कारंजा येथील महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या सर्व पत्रकार बंधूचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात करण्यात आला.त्यानंतरच्या सत्रात जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर,रात्री ०८:०० वाजता शैलेश गोजमगुंडे लिखित व अश्विन जगताप दिग्दर्शित "उंच माझा झोका ग" हे दोन अंकी नाटक सादर झाले.या नाटकाचे निर्माते प्रमोद जिरापुरे असून, नैपथ्य अंकित जवळेकर,प्रकाशयोजना सौ.अश्विनी जगताप,रंगभूषा सोनाली येळणे,वेशभूषा अर्पिता रामदेवकर,केशभूषा वंदना खंडारे तर नैपथ्य सहाय्य म्हणून अनिकेत चव्हाण,सुरज सौंदळे, अभिनव भालेराव,नितीन कोष्टी,यश सेंधवकर,कुणाल घाटे,सिद्धेश पायल,यांनी काम पाहिले या नाटकात सौ.श्रद्धा रगडे,वैष्णवी गाढवे,सतीश शिवहरे,गजानन पवार,राजेश परळीकर,अंजली कोळसकर,अमृता राठोड,तेजस्विनी वरठी, मयुरी गाढवे,तृप्ती रेनगडे,भक्ती गांजरे, श्रावणी देशमुख,खुशी गांजरे,वैदवी राऊत,दत्तराज दिग्रसकर, संजय सांगळे,ज्ञानेश्वर खंडारे,तथा बाल कलावंत म्हणून सई रेनगडे,व आराध्या बलखंडे यांनी भूमिका साकारल्या. "स्त्री अत्याचाराचे प्रतिबिंब" या नाटकांमधून दाखविण्यात आले. महत्वाचे म्हणजे हजारोच्या संख्येने नाटक पाहायला रसिक श्रोत्यांचा प्रतिसाद पाहायला मिळाला. या नाट्य महोत्सवच्या माध्यमातून कारंजेकरांना अतिशय रुचकर मेजवानी मिळाली असल्याचे विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी म्हटले.हा नाट्य महोत्सव यशस्वी करण्यासाठी आविष्कारच्या सर्व नाट्यकर्मी, नाट्यप्रेमी महिला म
पुरुष मंडळीसह सम्पूर्ण बाल कलावंत प्रयत्नशील होते.एवढेच नव्हे तर आयोजक अश्विन जगताप यांनी अगदी शून्यातून हा नाट्य महोत्सव यशस्वी करून दाखवला असेच म्हणता येईल. असे प्रसिद्धी प्रमुख संजय कडोळे यांनी कळवीले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....