जागतिक विचारवंत,धोरणकर्ते आणि डिजिटल नवोपक्रमकांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या इंडो-पॅसिफिक परिषदेत, वाशिम जिल्ह्यातील ग्राम कोंडोलीचे भूमीपुत्र, मा.मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे विशेष कार्य अधिकारी मा. अमोल बाबुराव पाटणकर यांनी “डिजिटल होरायझन्स ट्रान्सफॉर्मिंग क्रिएटिव्ह इंडस्ट्रीज”या शिखर परिषदेचे उद्घाटनपर भाषण दिले.ही परिषद हॉटेल ट्रायडेंट,बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) मुंबई येथे पार पडली.या भव्य कार्यक्रमाचे आयोजन डिजिटल कम्युनिकेशन नेटवर्क (डीसी एन) अमेरिकेचे राज्य विभाग (U.S.Department of State) आणि वर्ल्ड लर्निंग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.या परिषदेत १५० पेक्षा अधिक देशांतील प्रतिनिधी सहभागी झाले होते.आपल्या भाषणात अमोल पाटणकर यांनी तंत्रज्ञान,सर्जनशीलता आणि धोरणात्मक विकास यांच्या संगमावर प्रकाश टाकत कृत्रिम बुद्धिमत्ता (ए आय), ब्लॉकचेन आणि एआर/व्ही आर सारख्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे सर्जनशील क्षेत्रात झालेल्या बदलांवर ठळक भाष्य केले. “सर्जनशील उद्योग आता केवळ पूरक नाहीत,तर अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी आहेत आणि सौम्य शक्ती (soft power) म्हणून कार्य करतात असे मत पाटणकर यांनी व्यक्त करत,समावेशक आणि नितिमूल्याधिष्ठित डिजिटल वातावरणासाठी सहयोगाचे महत्त्व अधोरेखित केले.त्यांनी महाराष्ट्रातील स्थानिक पातळीवर सुरु असलेल्या डिजिटल सक्षमीकरणाच्या उपक्रमांचा उल्लेख करत सांगितले की परंपरा आणि तंत्रज्ञान यांचा सुंदर संगम सृजनशील अर्थव्यवस्थेला नवे आयाम देऊ शकतो.त्यांनी बौद्धिक संपदा हक्क (आयपीआर) संरक्षणाचेही महत्व स्पष्ट केले.या परिषदेचा उद्देश होता इंडो-पॅसिफिक भागातील देशांमध्ये सहकार्य वाढवणे, उदयोन्मुख तंत्रज्ञानावर चर्चा करणे आणि नवकल्पक सर्जकांना भविष्यासाठी सज्ज करणे.अमेरिकन राजनैतिक प्रतिनिधी, दक्षिण आशिया व ASEAN देशांतील धोरणकर्ते आणि ग्लोबल टेक लीडर्स यांच्या उपस्थितीने या परिषदेला अधिक व्यापक आणि जागतिक स्वरूप प्राप्त झाले.
मुंबई ही डिजिटल डिप्लोमसी आणि नवोपक्रमाचा एक महत्त्वाचा केंद्रबिंदू बनत चालली आहे.हे या परिषदेतून अधोरेखित झाले.असे वृत्त किरणभाऊ क्षार यांचेकडून मिळाल्याचे संजय कडोळे यांनी कळवीले.