अकोला/वाशीम : वाशीम जिल्ह्यातील मानोरा तालुक्याच्या ग्राम रुई गोस्ता येथील शेतकरी विश्वनाथ पाटील गावंडे यांचे सुपूत्र असलेल्या गोपाल पाटील गावंडे यांना पर्यावरणातील भौगोलीक,खगोलीय,नैसर्गिक घडामोडी व पशुपक्षाच्या विविध हालचालींवरून,हवामानाचा अभ्यास करण्याची कला अवगत झालेली असून एकप्रकारे त्यांचेवर देवराज इंद्रदेवांचे कृपाशिर्वाद असल्याप्रमाणेच त्यांची पावसाबद्दलची भविष्यवाणी असते.शेतकरी ग्रामस्थांना मार्गदर्शन देण्यासाठी आणि पावसापासून सतर्क करण्यासाठी ते अंदाज व्यक्त करीत असतात.ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे हे साप्ताहिक करंजमहात्म्य परिवाराकडून विविध वृत्तपत्रामधून बरेच वर्षापासून त्यांचे हवामान अंदाज प्रसिद्ध करीत असून त्यांचे अंदाज अनेकवेळ १००% अचूक ठरले हे विशेष. दि.२८ ऑगस्ट रोजी ऋषीपंचमी निमित्त सगळीकडे संत गजानन महाराजांच्या महाप्रसादाचे आयोजन सुरू असतांनाच अचानक दुपारी ०४:०० च्या सुमारास कारंजा व मानोरा तालुक्यात सोसाट्याचा वारा, ढगांचे प्रचंड गडगडाट आणि विजांच्या लखलखटात ढगफुटी सदृश्य अतिमुसळधार पावसामुळे शहर आणि खेडे जलमय झाल्याचे दृश्य पहायला मिळाले.कारंजा शहरातील रस्त्यांना नदी नाल्याचे स्वरूप आले होते.शाळा सुटण्याचे वेळेवर झालेल्या या अतिवृष्टीने सर्वात जास्त तारांबळ कॉन्व्हेन्टचे लहान मुले आणि शालेय विद्यार्थी विद्यार्थीनींची झाली.मानोरा कारंजा तालुक्यात शेतजमीनी वरील पिकांचेही अतोनात नुकसान झाले असल्याची भीती व्यक्त होत आहे.आमच्या प्रतिनिधींनी कळविल्या प्रमाणे सध्या याच वेळेला अकोला,अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातही अनेक ठिकाणी मुसळधार ते ढगफुटीसदृश्य पाऊस सुरु आहे. तसेच बुधवार दि.२७ ऑगस्ट रोजी सुद्धा खामगाव अकोला पातुर तेल्हारा येथे पाऊस झाला तर दुपारी १२:०० ते ०२ : ०० च्या आसपास संपूर्ण अकोट तालुक्यात ढगफूटी होऊन पंचक्रोशीतील सर्व नदी नाल्यांना महापूर गेल्याचे वृत्त आमचे अकोट येथील प्रतिनिधी विजय तेलगोटे यांनी कळवीले आहे. या संदर्भात रुई गोस्ता जि.वाशीम येथील हवामान अभ्यास गोपाल गावंडे यांचे कडून माहिती जाणून घेतली असता त्यांनी सांगितले की, सध्या बंगालच्या उपसागरातील चक्री वादळ आणि बंगालचा उपसागर ते अरबी समुद्रावरील वातावरणात अतिउच्च अशा तिव्रतेच्या कमी दाबाच्या पटट्यामुळे मान्सून जोरदार सक्रिय झाला असून त्याचाच परिणाम म्हणून संपूर्ण राज्यात पूर्व विदर्भ,पाश्चिम विदर्भात,दररोज भाग बदलवीत दि ०३ सप्टेंबर पर्यंत जोरदार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे,याकाळात दि २८ ते ३० ऑगस्ट रोजी काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य अति मुसळधार पाऊस होईल. असी शक्यता त्यांनी सांगितली असून,हे हवामानाचे अंदाज शेतकरी ग्रामस्थांना सतर्क व सावध करण्यासाठी असतात.असेही त्यांनी सांगीतले.तसेच "मधल्या काळात काही भागात महापूर येणे,विजा पडणे अशा घटना होऊ शकतात.त्यामुळे शेतकरी ग्रामस्थांनी सतर्क रहावे. दुपारपूर्वी शेतातून परत यावे.रात्री बेरात्री शेतात थांबू नये.नदी नाले पांदण रस्त्याला पुराचे पाणी असल्यास आपली गुरेढोरे, बैलबंडी, दुचाकी, चारचाकी वाहने, बसगाड्या पाण्यातून बाहेर काढू नये. नदीवरील शिकस्त झालेल्या पुलावरून ये जा करू नये.विजा चमकत असतांना हिरव्या झाडाचा आश्रय घेऊ नये.आणि अतिमहत्वाचे म्हणजे आपले मोबाईल फोन स्विच ऑफ करून ठेवावे.असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी केले आहे.