दिवसेंदिवस उन्हाचा पारा चांगलाच वाढला असून वाढत्या उन्हाने नागरिक घामाघूम झाले आहेत. घशाला कोरड पडत असल्याने थंडगार पाण्याच्या मागणीत सर्वत्र वाढ झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. मातीपासून बनविलेल्या माठाच्या मागणीत मात्र घट झाली असून आता माठातील थंड पाणी प्लास्टिकच्या कॅनमध्ये सहज उपलब्ध होत असल्याने मातीपासून माठ तयार करणाऱ्या कुंभार समाजावर उपासमारीची वेळ आली आहे.
कच्च्या मालाच्याही किंमती वाढल्याने त्यांच्या चिंतेत भर पडली आहे. सर्वसामान्य गरिबांची फ्रिज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माठाची मागणी ग्रामीण भागात आजही कायम असली तरी आधुनिक तंत्रज्ञानामुळे थंड पाणी तयार होण्यासाठी नवनवीन साधने आली असल्याने कुंभार समाजाचा व्यवसाय आता मोडीत निघत आहे. कुंभार व्यवसायिक विविध मातीपासून बनविलेल्या वस्तुची विक्री करतात, प्रमाणावर माठ विक्रीला येतात. तालुक्यासह ग्रामीण भागात ठिकठिकाणी माठाची दुकाने विक्रीअभावी दिसेनाशी झाली आहेत.
पूर्वीप्रमाणे खरेदीचे दर राहिलेले नाहीत. उन्हाळयात मातीच्या माठातील पाणी शरीराला थंडावा देते. याशिवाय आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक असल्याने सर्वसामान्य नागरिक मातीचे माठ खरेदी करणे पसंत करतात. माठातील पाणी शरीराला थंडावा देते. आता थंड पाण्याची आवश्यकता भासू लागल्याने माठाची मागणी ग्रामीण भागात, वाढत असली तरी शहरी भागात माठांची जागा ही प्लास्टिक कॅनने घेतली असल्याचे चित्र दिसून येत आहे.