कुर्झा वार्ड लक्ष्मी नगर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष भाऊरावजी शेंडे प्रमुख अतिथी वच्छलाबाई वानखेडे होते.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मदीक्षा देऊन या देशात धम्म क्रांती केली.यांची आठवण म्हणून धम्मचक्र प्रवर्तन दिवस साजरा करण्यात आला. यावेळी सकाळी ९:३० वा. महामानव भारतरत्न परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले तसेच महाकारूणी तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, तसेच ध्वजारोहण समाजाचे ज्येष्ठ नागरिक यशवंतजी भजगवळी यांनी केले. त्यावेळी त्रिशरण व पंचशील घेण्यात आली. त्यावेळेस समारंभाचे अध्यक्ष दीक्षित गजभिये उपाध्यक्ष पूजाताई मेश्राम सचिव शारदाताई हुमणे अनिताताई सहारे कोषाध्यक्ष तसेच बौद्ध बांधव महिला उपासक उपासिका उपस्थित होते तसेच सायंकाळच्या कार्यक्रमांमध्ये ओबीसी चे नेते सुखदेवजी प्रधान सर वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष हे होते तसेच एरमे साहेब मंडळ अधिकारी ब्रह्मपुरी प्राध्यापक अवतडे सर हे होते समारंभाचे अध्यक्ष दीक्षित गजभिये यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर मौलिक मार्गदर्शन करण्यात आले त्याचप्रमाणे अवतडे मॅडम यांनी खीरदान केले कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता समाजातील बौद्ध बांधव व भगिनी तसेच कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाला ओबीसी बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन पूजाताई मेश्राम तर आभार प्रदर्शन अनिता सहारे मॅडम हिने केले