वाशिम : न्यु पोतदार इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल वाशिम येथील इयत्ता दहावीची विद्यार्थीनी असलेल्या कु.अमृता रामेश्वर पचांगे हिने जिल्हाधिकारी बुवनेश्वरी (एस.) यांच्या मतदान जनजागृतीच्या आवाहनानुसार, जनजागृतीपर लघुमाहितीपट (व्हिडीओ लघु फिल्म) तयार केली असून सध्या संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येकाच्या मोबाईलवर फिरत असून , त्यामुळे मतदानाबद्दल चांगलीच जनजागृती होत आहे.तसेच सदर्हू मतदान जन जागृती बद्दल सर्व स्तरावरून तिचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.या लघु माहिती पटाचे प्रेरणास्थान जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.,मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, गटविकास अधिकारी अपूर्वा बासूर, सहा गटविकास अधिकारी गजानन खुळे, गट शिक्षणाधिकारी गजानन बाजड असल्याचे तिने सांगितले. तसेच सदहू लघु माहितीपट निर्मिती करीता शिक्षण विभाग,जिल्हा परिषद वाशिमचे सहा शिक्षक रामेश्वर पचांगे, श्रीकांत बोरचाटे, मिलींद इंगळे, निलश अवचार किशोर कांबळे यांचे सहकार्य लाभले. कु.अमृता रामेश्वर पचांगे हिचे वडील रामेश्वर मनोहर पचांगे तथा आई अर्चना रामेश्वर पचांगे हे जि.प.वाशिमच्या सेवेत असून, कारंजा (लाड) येथील महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त,विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे यांची ती भाची आहे.शिक्षणा सोबतच तीने वक्तृत्व,जाणता राजा महानाट्य, ज्युडो,कराटे,ढोल पथक,तलवारबाजी,दांडपट्टा इत्यादी खेळामध्ये प्राविण्य प्राप्त केले असून शहरातील बालासाहेब व्यायाम प्रसारक मंडळ वाशीमची उत्कृष्ट क्रिडापटू म्हणूनही ओळख आहे. कोव्हिड 19 कोरोना महामारी काळातही तिने जनजागृती आणि गरजू कुटूंबीयाना वडील रामेश्वर पचांगे गुरुजी यांच्या माध्यमातून अन्नदानाची मदत केली आहे.