वाशिम : आपले महाराष्ट्र राज्य आणि आपला भारत देश विविध वेशभूषा, केशभूषा, रंगभूषा,बोलीभाषा आणि महत्वाचे म्हणजे विविध धर्मानी नटलेला आहे. त्यामुळे समाजात प्रत्येक धर्माचे सण - उत्सव आणि परंपरा ह्या सातत्याने वर्षभर साजऱ्या होत असतात.तसेच शासन प्रशासनाची सुद्धा विविध सण त्यौहार, जयंत्या-पुण्यतिथ्या,कला-महोत्सव आणि संस्कृतिला परवानगी व पाठबळ असते. त्याकरीता शासनाचा पर्यटन व सांस्कृतिक विभागही कार्यरत असतो. शिवाय कला-लोककला नाट्य, रंगभूमि, चित्रपट सृष्टी यांना शासनाकडून मानधन व पुरस्कारही दिल्या जातात.व ही सर्वच मंडळी समाजात सर्वधर्म समभाव, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती निर्मूलनासह समाजात अहिंसा, शांती,सलोखा राष्ट्रीय एकात्मतेची आणि सर्वधर्मसमभावाची जनजागृती करीत असतात. मोगल-निजामाच्या अन्याय अत्याचारानी ग्रस्त असलेल्या महाराष्ट्रात, हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेकरीता, छत्रपती शिवरायांच्या मातोश्री जिजाऊ आऊसाहेब यांनी बालपणापासूनच शिवबांना आपल्या संस्कृती विषयीचे संस्कार देत साहित्य, आध्यात्म्य,कला,क्रिडा, युद्ध कौशल्यात शिवबांना तरबेज केले होते. हा इतिहास आपण कदापीही विसरू शकत नाही. आणि त्यामुळेच प्रत्येक आई, वडील, गुरुजन,शिक्षकांनी शाळा कॉलेज मधून शिक्षणा सोबतच आपल्या चिमुकल्यांना शिक्षण, राज्यशास्त्र, समाजशास्त्र व विज्ञाना सोबतच भारतिय संस्कृतीच्या साहित्य, कला, लोककला, नाट्य, क्रिडा, भारतीय आध्यात्म्य, सण, त्यौहार, सांस्कृतिक कार्यक्रमाचेही शिक्षण देणे अत्यावश्यक ठरते. भारतिय संस्कृतीचे विविध धर्मियांचे सण, त्यौहार, उत्सव आणि त्यानिमित्ताने केले जाणारे सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे निश्चितच अंधश्रद्धा नाहीत. परंतु समाजातील निवडक जातियवादी प्रवृत्ती ह्या केवळ विरोधाला विरोध म्हणून भारतीय संस्कृतीला आणि सांस्कृतिक कार्यक्रमाला विरोध करू पहात असतील तर त्यांचे "अंधश्रध्देच्या नावावर भारतिय संस्कृतीवर आघात करण्याचे कथीत प्रयत्न", समाजातील विद्वान व्यक्ती, साहित्यीक आणि पत्रकारांनी हाणून पाडलेच पाहीजे. ती आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. असे आवाहन वाशीम जिल्ह्यातील महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यीक, पत्रकार विदर्भ लोककलावंत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय कडोळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रसारमाध्यमाकडे केले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....