भंडारा:-अंगावर वीज कोसळून 25 महिला जखमी झाल्याची घटना भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील चिचाळा गावात आज घडली आहे भंडारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. चिंचाळा गावातल्या या 25 महिला भर पावसात भात रोवणी करत होत्या. रोवणी सुरू असतानाच विजेचा मोठा कडकडाट झाला आणि अचानक सर्व महिला शेतातच बेशुद्ध पडल्या. अड्याळच्या ग्रामीण रुग्णालयांमध्ये सदर महिलांना उपचारासाठी दाखल केलेले आहे.