अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. १७) सायंकाळी ७:४० वाजताच्या सुमारास भिकेश्वर जवळ घडली. आशिष चोकेश्वर मस्के (२६) रा. भूज एकारा असे मृताचे नाव आहे. भिकेश्वर परिसरात सायंकाळी पाऊस सुरू होता. त्यामुळे रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती. अशातच अज्ञात वाहनाने दुचाकीस्वार असलेल्या आशिष ला जोरदार धडक दिली. त्यामध्ये आशीषचा जागीच मृत्यु झाला.धडकेनंतर अज्ञात वाहन घटना स्थळावरून पसार झाले.
आशिष एक उभरते,चमकते व्यक्तिमत्व... गावात, मस्के परिवारात, मित्र मंडळीत..गोंडस स्वभावाचा सर्वांचा लाडका असलेला आशीष उर्फ गोलू चोकेश्वर मस्के....इंजिनियर अविनाश मस्केचा भाऊ होता.दिनांक :-१७/८/२०२३ ला चुलत भाऊ आदित्यचा वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त सिंदेवाही वरुन ब्रम्हपूरी ला यायला निघाला असता एका अज्ञात वाहनाने दुचाकीस्वार आशीषला नागभिडजवळ असलेल्या भिकेश्वर गावाजवळ जब्बर धडक दिली आणि होत्याचे नव्हते झाले.वाढदिवसाची संपूर्ण तयारी झालेली...फक्त केक कापायचे बाकी राहिले होते.संपूर्ण मस्के परिवार आणि मित्र मंडळी आशिषची आतुरतेने वाट पाहत होते.पण काळाला ते मंजूर नव्हते. आणि आशीषचा अज्ञात वाहनाच्या धडकेत प्राणज्योत मावळली.
त्याचा आज दिनांक :-१८ /०८/२०२३ ला दुपारी १:०० वाजता भूज येथील स्मशानभूमीत अंत्यविधीचा कार्यक्रम आहे. तरी नातेवाईक, मित्र मंडळी आणि आप्तेष्टांनी उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण करावी.
उमदा,कर्तृत्वान, शांत,संयमी, मनमिळाऊ आशिष च्या जाण्यामुळे मस्के परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.ईश्वर या दु:खातून सावरण्याची बळ देवो.
आशिषच्या आत्म्यास चिरशांती प्राप्त होवो.ही ईश्वरचरणी प्रार्थना.भावपुर्ण श्रद्धांजली