कारंजा :- शिवनेरी फायनान्स कार्यालय,गुरूदेव नगर मंंगरुळपीर रोड, बायपास, कारंजा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तिचे पूजन व हारार्पण - नवनिर्माण फाऊंडेशनचे अध्यक्ष अनुप ठाकरे यांचे हस्ते करण्यात आले. त्यानंतर उपस्थित संचालक मंडळाचे सर्व सदस्यांनी सुद्धा महाराजांच्या मूर्तिचे पूजन केले.उपस्थित शिवभक्तांनी शिवरायांचे पूजन केल्यानंतर, शिवचरित्र अभ्यासक व शिवनेरी फायनान्स सर्विसेसचे संचालक पुंडलिक लसनकुटे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर व शिवराज्याभिषेक सोहळ्याबद्दल आपले विचार मांडले.
शिवराज्याभिषेक सोहळयानिमित्त संपन्न झालेल्या कार्यक्रमांस नवनिर्माण फाऊंडेशनचे अध्यक्ष अनुप ठाकरे,समाजसेवक अमोल मसाळकर,कोषाध्यक्ष नितीन तायडे, संचालक पुंडलिक लसनकुटे,गणेश माटोळे,सतिश चिनक,सागर इंगळे,समाजसेवक विनोद बांडे,शुभम रोकडे इत्यादी उपस्थित होते.