कारंजा (लाड) : प्रजापिता ब्रम्हकुमारी विश्व विद्यालय माऊंट आबूच्या कारंजा येथील केंद्राचे, ब्रम्हकुमारी परिवारातील जुने जाणते सेवाधारी संजय कडोळे यांचे कनिष्ठ बंधु,स्व.उमेश कडोळे हे नुकतेच काही दिवसांपूर्वी स्वर्गवासी झाले. त्यांचे मृत्युने कारंजा येथील विविध क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत असतांनाच,ब्रम्हकुमारी परिवाराकडून राजयोगीनी मालती दिदी यांच्या मार्गदर्शनात त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी ब्र.कु.नयना दिदी,ब्र.कु.खोपे बहन,ब्र.कु.रावळे बहन, विल्हेकर बहन,ब्रम्हकुमार डॉ. निखिल भाई कटारिया,बी. के.प्रविणभाई दिघडे प्राचार्य बी. के.अशोक भाई उपाध्ये,बी.के. गुलाबभाई ढेरे,बी.के.लोमेशभाई चौधरी, प्रदिपभाई वानखडे इ.हजर होते. शांती,अहिंसा,विश्वास ह्या बिदाला अनुसरून सत्संगी जीवन व्यतीत करणारे,आनंदी व हास्यमुख चेहऱ्याचे सुस्वभावी व्यक्तीमत्व स्व.उमेश मधुकरराव कडोळे हे पूर्वाश्रमीचे ब्रम्हकुमारी परिवाराचे सदस्य होते.ते धार्मिक तथा आध्यात्मिक विचारसरणीचे सत्संगी म्हणून ओळखले जायचे. ते उत्कृष्ट गायक,वादक आणि पारंपारिक जातीवंत लोककलाकार होते.ते अकोला जिल्हा न्यायालया अंतर्गत दिवानी व फौजदारी न्यायालयात वरिष्ठ लिपिक पदावर कार्यरत होते.ओम् शांती !