महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ब्रह्मपुरी शहरातील हनुमान नगर येथील हनुमान मंदिराच्या पटांगणात विविध वृक्षांचे रोपण करण्यात आले.
दिवसेंदिवस पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास व पृथ्वीवरील वातावरणाचे संतुलन अबाधित राखण्यासाठी शिवसेना पक्षाचे तथा महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची माझी वसुंधरा ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी, महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेनेच्या पूर्व विदर्भ महिला संघटिका प्रा. शिल्पा बोडके यांच्या सूचनेनुसार व शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा चंद्रपूर संघटिका नर्मदाताई दत्ताभाऊ बोरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना ब्रह्मपुरी महिला आघाडीच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले यावेळी महिला आघाडीच्या महिला कार्यकर्त्यांनी ब्रह्मपुरी शहरातील हनुमान नगर येथील हनुमान मंदिर परिसरात विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड केली.
सदर वृक्षारोपण कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना ब्रह्मपुरी महिला आघाडीच्या उपतालुका संघटिका कुंदा कमाने, ललिता कामडी, दिपाली दुनेदार, कविता प्रधान, राखी बानाईत, सुशिला मेश्राम आदी. ब्रह्मपुरी शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.