वाशिम : सांस्कृतिक कार्य विभाग,सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जिल्हा प्रशासन, वाशिम यांच्या संयुक्तवतीने २७ ते ३१ जानेवारी २०२४ दरम्यान महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.या महोत्सवात संपूर्ण महाराष्ट्रात सुपरिचित असलेले निष्काम कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या वेशभूषेत अस्सल व-हाडी भाषेत विविध विषयांवर समाजोपयोगी उपक्रम राबविणारे सामाजिक कार्यकर्ते तथा प्रबोधनकार पी.एस.खंदारे व सह कलावंतांचा आदर्श जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर संगीतमय किर्तनाचे आयोजन ३० जानेवारी २०२४ रोजी रात्री ८.३० वाजता जिल्हा क्रीडा संकुल,वाशिम येथे केले आहे.या शिवचरित्र संगीतमय किर्तनाचा नागरिकांनी लाभ घ्यावा.असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.