कारंजा : भटक्या विमुक्त समाजाच्या नागरिकांना शिक्षणाचे महत्व पटवून देत शिक्षणाचा संदेश देण्याकरीता, कार्यक्रमाच्या आयोजक, स्थानिक तेजस्विनी महिला बहुउद्देशिय संस्थेच्या अध्यक्षा कविता गजानन सवाई यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मानोरा रोडवरील, भटक्या विमुक्तांच्या पालावर साजरी केली. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी, वाशीम जिल्हा चित्रकथी समाजाचे अध्यक्ष राजुभाऊ अवताडे हे होते. तर प्रमुख उपस्थिती मध्ये सामाजिक समता प्रबोधन मंच कारंजाचे अध्यक्ष हंसराज शेंडे, विनायकराव पद्मागीरवार, डॉ.चंदाशिव, गुंजाटे, शेळके पाटील हे होते. सर्वप्रथम मान्यवरांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पन केले. उपस्थितांनी आपल्या संभाषणातून क्रांतिज्योती यांनी शिक्षणाकरीता कशाप्रकारच्या हालअपेष्टा भोगून स्त्री शिक्षणावर भर दिला हे समजावून सांगीतले.
पालावरील प्रमुख बाळू शाहीर व भटक्या समाजाच्या मुलामुलींना उपस्थितांनी शिक्षणाचे महत्व पटवून दिले असे वृत्त संजय कडोळे यांनी कळवीले आहे.