वरोरा :- वरोरा तालुक्यातील दादापूर येथील अंगणवाडी तर्फे गरोदर मातांना व तिच्या लहान मुलांना शासना तर्फे देण्यात आलेल्या पोषण आहारात पाल आढळून आली. पती प्रवीण च्या लक्षात आल्याने मोठी दुर्घटना होता होता.. वाचली. शालेय पोषण आहाराच्या पाकिटात आढळून आलेल्या विषयाची आता अधिकाऱ्यांनी दादापुर येथे जाऊन चौकशी केली व पिसाळकर मॅडम, पर्यवेक्षक, अधिकारी यांनी चौकशीचे आदेश दिले आहे.
किरण प्रवीण नन्नावरे या गरोदर मातेला व तिचा मुलगा प्रियश याला 18 जून 2024 ला देण्यात आलेल्या पोषण आहारात ( खिचडी पाकिट ) हे 24 जून ला खिचडी बनविण्यासाठी उघडले असता हा प्रकार लक्षात आला.
चौकट:-
शेतीचे कामे आटोपल्यावर
तक्रार : प्रवीण नन्नावरे हा शेतकरी असून त्याने अंगणवाडी मदतनीस यांना हा प्रकार सांगितले असता त्यांनी हात वर केले पुरवठादार हा या प्रकारात दोषी असल्याने याची तक्रार वरिष्ठाकडे नोंदवावी असा सल्ला दिला परंतु शेतीचे कामे असल्याने प्रवीण याने सोमवारला ( 8 जुलै ) तक्रार नोंदवली. दादापूर येथील अंगणवाडी सेविके ने मुख्य सेविकेला ( शेगाव ) माहिती दिली असता उडवा उडवीचे उत्तर देत प्रवीणचे समाधान करण्याचे प्रयत्न केले अखेर प्रवीण ने पंचायत समिती गाठून बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे पुरावे देत तक्रार नोंदवली लहान मुलांना मिळणाऱ्या पोषण आहारामध्ये पाल आढळणे म्हणजेच जीवनाशी खेळण्याचा प्रकार असून या प्रकारामुळे बालकाचा तसेच गरोदर मातेचे जीवही जाण्याची संभावना नाकारता आली नसती. या सर्व प्रकारावर वरिष्ठ अधिकाऱ्याने चौकशीचे आदेश दिले असून या प्रकारावर पुरवठा दारावर कारवाई होणार का? याकडे जनतेचे लक्ष लागलेले आहे. या संदर्भात महिती घेण्यासाठी प्रतिनिधि गेले असतां अधिकाऱ्यांनी पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराबाबत अहवाल तयार केल्याचे सांगितले