मागील अनेक दिवसांपासून ब्रह्मपुरी तालुक्यासह परिसरात पावसाने थैमान घातले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे व नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे चंद्रपूर जिल्ह्यातील पूर परिस्थितीची पाहणी करायला आले असता त्यांची अतुल देशकर यांनी भेट घेतली व ब्रह्मपुरी तालुक्यातील अतिवृष्टी व पुरामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा दिला.
या वेळी आपादग्रस्तांना तात्काळ मदत करावी, शेतजमिनीचे व पडलेल्या घरांचे त्वरित पंचनामे करण्यात यावे, आपादग्रस्तांना लवकरात लवकर योग्य तो मोबदला सरसकट देण्यात यावा, शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम त्वरित देण्यात यावी, ब्रह्मपुरी तालुक्यातील जुगनाळा व गांगलवाडी गावाजवळील नाल्यावर उंच पुलाचे बांधकाम करावे, ब्रह्मपुरी तालुक्यातील वैनगंगा नदीच्या काठावर असलेल्या लाडज रणमोचन व खरकाडा गावाचे पुनर्वसन करण्यात यावे, पुरामुळे नुकसान झालेल्या ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरुस्ती त्वरित करण्यात यावी. या सर्व समस्या पुर्ण करण्या बाबत मागणी करत उपमुख्यमंत्री यांच्या सोबत सविस्तर चर्चा केली व यावर कार्यवाही करू असा सकारात्मक विश्वास मा. ना. देवेंद्रजी फडणवीस यांनी याप्रसंगी दिला.
यावेळी संजय गजपुरे, मनोज भूपाल, अरविंद नंदुरकर, साकेत भानारकर, तनय देशकर व नितीन बोदेले उपस्थित होते.