कारंजा (लाड) (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) : भारतीय संस्कृती आणि साहित्य ची खरी ओळख श्रीराम यांच्यापासून सुरू होते काळानुरूप साहित्यात बदल झाले असले तरी सर्वच साहित्य वाचनीय व्हावे याकरिता वाल्मिकी रामायण,संत एकनाथ महाराज यांचे भावार्थ रामायण समजून घेणे गरजेचे आहे इस्लामिक राजवटी मध्ये आमच्या येथील सर्व अस्थांवर आघात करण्यात आले त्यानंतर संत तुकाराम संत एकनाथ यांनी सर्व समाजाला एकत्र आनण्याचे काम वारकऱ्यांचे माध्यमातून केले असे प्रतिपादन भाजपा चे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी कारंजा लाड येथील जे सी हायस्कूल येथे अखिल भारतीय साहित्य परिषद वाशिम जिल्हा चे वतीने आयोजित साहित्यातील श्रीराम याविषयावर व्याख्यान देताना केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी साहित्य परिषदेच्या अध्यक्षा सौ रेखाताई चवरे,प्रमुख उपस्थित डॉ सुशील देशपांडे , आशिष तांबोळकर, शिरीष चवरे ,शाळेचे मुख्याध्यापक उदय नांदगावकर ,मुख्याध्यापिका सौ अनिता चोपडे होते
सर्वप्रथम प्रमुख पाहुण्यांचे हस्ते श्रीराम व सरस्वती यांचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच सर्व पाहुण्यांचा सत्कार पुस्तक देऊन साहित्य परिषदेच्या वतीने करण्यात आला
याप्रसंगी प्रमूख वक्ते शिवराय कुळकर्णी म्हणाले की भारतीय संस्कृती समजून घ्यावयाची असेल तर राम ,कृष्ण,भगवान महावीर यांना समजून घ्यावे लागेल,रामाचे नावाचे उच्चार केल्याने सर्व पापांचे उच्चाटन होते इतकी ताकद रामनावा मध्ये आहे
ग.दी माडगूळकर यांचे मते राम ज्या रस्त्यावरून चालले तो तर सत्याचा मार्ग आहे त्या रस्त्याने आपण चाललो तर कशाचीही भीती नाही,राम यांनी कोणती जादूचे प्रयोग केले नसून त्यांचे १४ वर्षाचे वनवास प्रवासात अठरा पगड जातींचे संगठन केले तसेच पीडित, शोषित,वंचित महिलांना देखील न्याय दिला ,रामाने खडतर मार्गाने प्रवास करतांना पृथ्वी निशीचर हिन करण्याचा प्रयत्न केला
त्याकाळात कुळ न पाहता अज्ञात कुळाच्या सितेशी लग्न केले कारण सीता ही शेतातील नांगर करत असताना पेटीत जनक राजांना सापडली होती त्यामळे आपण देखील रामाचे मार्गाने जाण्याचा प्रयत्न करावा असे सांगितले
याप्रसंगी सन १९९० व सन १९९२ मधील कार सेवेकरीता गेलेले साहित्य परिषद चे महामंत्री आशिष तांबोळकर यांची दोन्ही वेळेचे कारसेवेचे अनुभव कथन करून त्यावेळेसचे रोमांचकारी प्रसंग सांगितले व वादग्रस्त ढाचा त्यावेळेस पडल्या मुळेच राम प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला.
असल्याचे व त्यामध्ये कारंजा तील कार सेवकांचे योगदान असल्याचा उल्लेख केला, तर प्रमुख उपस्थित डॉ सुशील देशपांडे यांनी श्रीरामा शिवाय साहित्य निर्मिती होऊच शकत नसल्याचे प्रतिपादन केले,तर आर जे चवरे हायस्कूल च्या विद्यार्थ्यांनी गीतरामायण चे उत्कृष्ट सादरीकरण केले,
चित्रकूट येथील भारतरत्न नानाजी देशमुख यांचे नेतृत्वात व विद्यावाचस्पती श्रीराम शेवाळकर यांनी साकारलेल्या रामदर्शन प्रकल्प बाबत च्या चित्रफित दाखविण्यात आल्यात त्याचा हिंदी अनुवाद सौ पूजा हेडा यांनी केला
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ रेखाताई चवरे यांनी करताना साहित्य परिषद चे कार्याची माहिती दिली व होत असलेल्या कार्यक्रमाबाबत अवगत केले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्षा सौ सीमा तांबोळकर यांनी तर आभार प्रदर्शन कविश गहाणकरी यांनी केले
याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक श्री श्रीकांतजी देशपांडे यांनी कार्यक्रमास भेट देऊन उत्कृष्ट आयोजनाबाबत समाधान व्यक्त केले तसेच त्यांचे हस्ते गीत रामायण सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांचा पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी शहरातील साहित्य रसिक व शिक्षक प्राध्यापक मोठया प्रमाणात उपस्थित होते
आपल्या प्रतिक्रिया द्या....