डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय ग्रामीण व शहरी सामाजिक विकास संस्थेचा उपक्रम प्रवासधारकांमध्ये गाव परिसरातील लोकांमध्ये होत आहे समाधान व्यक्त
आरमोरी तालुक्यातील ठाणेगाव ते वैरागड चामोर्शि टी पॉईंट मुख्य रस्त्यावरील काही जड वाहनाच्या वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणात रस्त्यावर खड्डे पडले होते. आणि या खड्ड्यामुळे प्रवासधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. या मुख्य रस्त्याने रात्री दिवसाच्या सुमारास मोठ्या प्रमाणात वाहतूक चालत असते. यामुळे मुख्य मार्गावर पडलेल्या खड्ड्यामुळे कधी या मार्गावर अपघात सुद्धा घडले आहेत.याची जाणीव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय ग्रामीण व शहरी सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष दिनेश बनकर पत्रकार आणि संस्थेचे सचिव भारत कुंबरे यांना कळाली आणि एक सामाजिक दायित्व म्हणून दिनांक 17. 9 .2025 रोजी मुख्य मार्गावरील खड्डे बुजवीण्याचे काम समाज हिताचे काम संस्थेच्या वतीने करण्यात आले. एक सामाजिक दायित्व म्हणून सार्वजनिक समाज हिताचे काम म्हणून खड्डे बुजवण्याचे काम संस्थेच्या वतीने करण्यातआल्याने प्रवासधारकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय ग्रामीण व शहरी सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष दिनेश बनकर व सचिव भारत कुंबरे यांच्या या सार्वजनिक सामाजिक कार्याबद्दल जनतेनी आभार मानले आहे.