वाशिम (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे)महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व नॅशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टीस आणि पुरोगामी संघटनेच्या वतीने . राष्ट्रपती व विविध आयोग यांना निवेदन देण्यात येणार ; मणिपूरमधील महिलांवर अत्याचार केलेल्या व्यक्तींवर तात्काळ कारवाई करावी याबद्दल निवेदन बुधवार दिनांक २६ जुलै, २०२३ रोजी, वाशिम जिल्हा अधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपती व अन्य भारत सरकार च्या विविध आयोगाना देण्यात येणार .
मणिपूर राज्यात गेल्या अनेक महिन्यापासून हिंसक घटना व जाळपोळ होत आहे. तेथे शांतता कधी प्रस्थापित होईल याची सर्वजण वाट बघत असताना; एक धक्कादायक बातमी आली. मणिपूरची राजधानी इम्फाळा पासून ३५ कि. मी. दूर कंगपोकपी जिल्ह्यात एका समुदायातील लोकांनी दुसर्या समुदायातील दोन महिलांना नग्न करून धिंड काढली व त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला. या घटनेचा व्हायरल झालेला व्हिडिओ बघून देशातील नागरिकांना धक्का बसला. "हिंसा के खिलाफ, मानवता की ओर" अभियान चालवणार्या, "महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती"या संघटनेला सुध्दा यामुळे दु:ख झाले आहे. तसेच हि संघटना या घटनेचा निषेध करते.
मागील काही वर्षांपासून महिलांवर अत्याचार करणार्यांना शिक्षेतून सूट देऊन त्यांचे उदात्तीकरण करणे अशा घटना सुध्दा घडल्याचे समोर आले आहे. यामुळे महिलांवर अत्याचार करणार्यांना प्रोत्साहन मिळाले आहे व अत्याचाराच्या घटनांत वाढ झाली आहे, असे म्हणणे चुकीचे होणार नाही.
या अत्याचार घटनेतील प्रत्येक दोषींवर ताबडतोब गुन्हा दाखल करून फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवून त्यांना कठोर शासन करावे अशी आम्ही मागणी करत आहोत. याव्यतिरिक्त आम्ही अपेक्षा करतो की महिलांवर अत्याचार करणार्यांच्या शिक्षेत सूट, त्यांचे उदात्तीकरण अशा घटना थांबवण्यासाठी सुध्दा उपाययोजना केल्या पाहिजेत.
महिलांवरील अत्याचारांच्या देशातील वाढत्या घटना बघून आम्ही आग्रहपूर्वक मागणी करतो की अत्याचारग्रस्थ महिलांना न्याय देताना अत्याचारींचा धर्म, जात, राजकीय निष्ठा यांच्या आडून अत्याचारी व्यक्तींना कोणत्याही प्रकारची सूट न देता त्यांना कठोर शिक्षा करावी तसेच मनिपुर सरकार जनतेला सुरक्षा देण्यात असमर्थ असल्याने राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी आम्ही मागणीचे .
निवेदन महा. अंनिसच्या वतीने देण्यात येणार आहे.
वाशिम जिल्ह्यातील सर्व शिव, फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आणि पदाधिकारी व हीतचिंतकाने उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पी.एस.खंदारे,महेश देवळे, विजय शिंदे पाटील, सखाराम ढोबळे पाटील, महिला विभाग प्रमुख कुसुमाताई सोनुने व दतराव वानखेडे, ग.ना.कांबळे, वानखेडे यांनी केले आहे
आपल्या प्रतिक्रिया द्या....