कारंजा : समग्र शिक्षा अभियानांतर्गत 2023-24 या आर्थिक वर्षात राज्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेमध्ये भारतरत्न डॉ.एपीजे अब्दुल कलाम सायन्स अँड टेक्नॉलॉजी इनोव्हेटिव्ह सेंटरची उभारणी करण्यात येणार आहे. निविदा धारकामार्फत उभारणी करण्यात येणाऱ्या नमुना केंद्राचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या समितीमध्ये बाबासाहेब धाबेकर विद्यालय यावर्डीचे मुख्याध्यापक तथा विज्ञान शिक्षक विजय भड यांची तज्ञ म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे.
निविदा प्रक्रियेमधील सहभागी होणाऱ्या निविदा धारकाकडून नमुना केंद्राची जवाहर बालभवन, मुंबई येथे उभारणी करण्यात येत असून सदर केंद्रातील साहित्य बाबत शैक्षणिक दृष्टीने उपयुक्ततेबाबत सर्वेक्षण करून अहवाल सादर करन्याकरिता 14 डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता पासून तर 15 डिसेंबर रोजी दुपारी पाच वाजेपर्यंत जवाहर बाल भवन मुंबई येथे तज्ञ म्हणून उपस्थित राहण्याबाबत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबईचे राज्य प्रकल्प संचालक प्रदीप कुमार डांगे यांनी एका पत्रद्वारे कळविले आहे.
निविदा धारकामार्फत उभारणी करण्यात येणाऱ्या नमुना केंद्राची सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या समितीमध्ये महाराष्ट्रातील एकूण नऊ तज्ञाची निवड केलेली आहे. या निवड केलेल्या नऊ तज्ञापैकी एक डाएट प्राचार्य,एक डाएट अधिव्याख्याता, दोन गटशिक्षणाधिकारी, एक विषय साधन व्यक्ति, एक विषय सहाय्यक व तीन शिक्षक आहेत. या तीन शिक्षकांपैकी एक शिक्षक मुंबईचे दुसरे जिल्हा परिषदचे तर तिसरे बाबासाहेब धाबेकर माध्यमिक विद्यालय यावर्डीचे मुख्याध्यापक तथा विज्ञान शिक्षक विजय देविदास भड हे एकमेव निवड झालेले ग्रामीण भागातील खाजगी शाळेचे मुख्याध्यापक तथा विज्ञान शिक्षक आहेत.
भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम सायन्स अँड टेक्नॉलॉजी सेंटर उभारणीच्या समितीमध्ये तज्ञ म्हणून निवड झाल्याबद्दल माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेंद्र शिंदे,उपशिक्षणाधिकारी आकाश आहाळे,योजना शिक्षणाधिकारी गजानन डाबेराव, करंजा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्रीकांत माने, विस्तार अधिकारी गजानन उपाध्ये, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष विनोद नरवाडे उपाध्यक्ष बाळासाहेब गोटे तसेच वाशिम जिल्ह्यातील बहुसंख्य मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.