ब्रम्हपुरी:-
तालुक्यातील बोढेगाव येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत नवीन वर्गखोलीचे बांधकाम करण्यात आले आहे. सोबतच शाळेच्या परिसरात पेव्हर ब्लॉक व संरक्षणभींत दुरुस्तीचे कामही करण्यात आले. या कामांचे लोकार्पण जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष कृष्णा सहारे यांच्या हस्ते पार पडले.
सोबतच जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुख्याध्यापक भाऊराव कावळे हे सेवानिवृत्त झाल्याने त्यांचाही सेवानिवृत्तीपर सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
यावेळी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ग्रामपंचायतीचे सरपंच मंगेश नन्नावरे, पं.स. गटशिक्षणाधिकारी माणिक खुणे, माजी मुख्याध्यापक दयाराम अवसरे, ग्रामसेवक रंजीत नंदेश्वर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रफुल्ल नन्नावरे, उपाध्यक्ष गायत्री धोटे, मंगलाताई मुलताने, शामल दिघोरे, संगिता नन्नावरे, श्रीकृष्ण ढोंगे, धर्मदास नन्नावरे, उपसरपंच नंदाताई नन्नावरे, ग्रा.पं.सदस्य रमेश नन्नावरे, रोजगार सेवक अरविंद नखाते व अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष कृष्णा सहारे यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेला आपल्या कार्यकाळात भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचा सुध्दा गावकऱ्यांनी सत्कार केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कडु सर यांनी तर आभारप्रदर्शन प्रफुल नन्नावरे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ऋषी दिघोरे यांसह संपूर्ण गावकऱ्यांनी सहकार्य केले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....