अकोला:- बहुजन समाज पार्टीची महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष माननीय एडवोकेट परमेश्वर गोणारे व प्रदेश सचिव विदर्भ इन्चार्ज दादासाहेब ऊईके यांचे आज अकोला येथे सर्किट हाऊस मध्ये भव्य स्वागत सत्कार आयोजित करण्यात आला होता बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी व लोकनेता डॉक्टर धनंजय उर्फ बाबा नालट जिल्हा प्रभारी प्राध्यापक व्ही आर कांबळे बहुजन समाज जिल्हा अध्यक्ष रमेश जी इंगळे यांनी स्वागत केले त्यानंतर अकोला जिल्हा समीक्षा बैठक मध्ये पाच विधानसभेचे आढावा घेण्यात आला व पुढील 2024 लोकसभेसाठी रणनीती ठरविण्यात आली. यामध्ये नया युवा चेहरा अकोला नया खासदारकीसाठी चर्चा मंथन करण्यात आले समीक्षा बैठक मध्ये बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष प्रदेश अध्यक्ष माननीय परमेश्वर गोणारे प्रदेश सचिव दादासाहेब ऊईके यांनी मार्गदर्शन केले या जिल्हा बैठकीमध्ये बहुजन समाज पार्टीचे माजी प्रदेश सचिव विजय येलकर जिल्हा सचिव वीरेंद्र शिरसाट वामनराव सरकटे विजय गणवीर डॉक्टर एस एस तायडे गुणवंत शिरसाट एडवोकेट शीला गवई तसेच जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी तालुका पदाधिकारी बहुजन समाज पार्टीचे सर्व जिल्हा कार्यकर्ते जिल्हा पदाधिकारी समीक्षा बैठक हजर होते कार्यक्रमाचे संचालक बहुजन समाज पार्टीचे प्रसिद्धीप्रमुख सागर नानीर केले तर आभार प्रदर्शन बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी डॉक्टर धनंजय उर्फ बाबा नालट यांनी केले