कारंजा : कवी सरकार स्वाभिमानी वाचन मंदिर इंगळी ता हातकणंगले जिल्हा कोल्हापूर यांचेकडून कोल्हापूर येथे नुकतेच १५ वे मराठी ग्रामीण साहित्य संमेलन संपन्न झाले. यावेळी वसंत नानाजी चिवरकर हे उत्कृष्ट गायक तसेच हार्मोनियम वादक असल्यामुळे त्यांच्या ह्या कार्याची पोचपावती म्हणून त्यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट हार्मोनियम वादक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच सौ. शीलाताई चिवरकर ह्या एक उत्कृष्ट कवीयत्री असून पर्यावरणप्रेमी व प्रबोधनकार आहेत, त्यांच्या ह्या कार्याची दखल म्हणून त्यांना राज्यस्तरीय प्रेरणा साहित्य गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी संस्थेच्या वतीने कादंबरी, कविता संग्रह अशा वेगवेगळ्या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. नवोदित लेखकांना प्रोत्साहन देऊन लेखनास, वाचनास प्रवृत्त करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक शैलजा परमाने, किशोर शिंदे, डॉ. श्रीकांत पाटील, नंदिनी कदम, डॉ. सुरेश कराळे, ॲड. सर्जेराव सावळी सावळी, सौ.शिलाताई चिवरकर, डॉ. मधुकर हुजरे यांनी आपले विचार मांडले. त्यांना मिळालेल्या ह्या गौरवा बद्दल कारंजेकरांकडून कौतुक करण्यात येत आहे.