तरुणाची विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची खळबजनक घटना आज दिनांक:-28/12/2024 ला उघडकीस आली.
निकेश होमदेव चापले वय वर्षे 25,तळोधी (खुर्द) ता.ब्रम्हपुरी जि.चंद्रपूर या गावातील रहिवासी आहे.
सविस्तर वृत्त्त असे आहे की, निकेश नामक तरुण हा अंदाजे तिन चार दिवसापासून घरून निघुन गेला असल्याचे बोलले जात असून अजूनही निकेश घरी का आला नाही म्हणून निकेशचा शोध घरच्यांनी घेतला असता जी दुचाकी घेवून घरून निघून गेला होता.ती दुचाकी त्याच्या स्वमालकीच्या शेतावर जाणाऱ्या पांदन रस्त्यालगत आढळून आली.तेव्हा घरच्यांनी शेतातील विहीर बघितले असता आज दिनांक २८/१२/२०२४ ला विहिरीच्या पाण्यावर निकेश चा शव तरंगत होता.
आत्महत्या करण्याचे कारण अद्यापही कळू शकले नाही.
निकेशच्या पच्छात्य आई बाबा भाऊ असा परिवार आहे.
त्याच्या जाण्याने चापले कुटुंब शोकसागरात बुडालेला आहे.