कारंजा : ना दिवाकर रावते परिवहन मंत्री असतांना मोठा गाजावाजा करीत त्यांनी स्मार्ट कार्ड योजना सुरु केली होती . त्यानुसार प्रत्येक नागरिकांना महामंडळाच्या बस प्रवासाकरीता स्मार्ट काढण्याची सक्ती करण्यात येऊन स्मार्टकार्ड बंधनकारक करण्यात आलेले होते. मात्र तब्बल तिन वर्ष होऊनही ही योजना अंमलात येऊ न शकल्याने महामंडळाचे करोडो रुपये स्मार्ट कार्ड काढणार्या खाजगी कंपनी ठेकेदाराच्या घशात गेल्याचा आरोप महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांनी केला आहे . या संदर्भात चौकशी नंतर प्रसार माध्यमाशी बोलतांना त्यांनी सांगीतले की, गेल्या सहा महिन्या पेक्षा जास्त काळापासून स्मार्ट कार्ड योजनेची वेबसाईट आणि ऑनलाईन संपर्क सुद्धा कंपनीने बंद केल्याने नव्याने स्मार्ट काढणे . किंवा स्मार्ट कार्डाची नोंदणी व नुतनिकरण करणे सुद्धा बंद करण्यात आलेले आहे . त्यामुळे पुर्वीप्रमाणेच, कंडॅक्टरला रोख रक्कम देऊन तिकीटा काढून नागरिकांना प्रवास करावा लागत आहे .