वाशिम :
जिल्हा रुग्णालय, वाशिम येथे आज मंगळवारपासून ४० व्या नेत्रदान पंधरवड्याचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात झाला. या उपक्रमातून समाजात नेत्रदानाबाबत जनजागृती करून अधिकाधिक लोकांना या पुण्यकार्याशी जोडण्याचा संकल्प करण्यात आला.
उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, पोलीस अधीक्षक अनुज तारे, मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पीत चव्हाण, प्रशिक्षणार्थी आयएएस आकाश वर्मा, प्रशिक्षणार्थी आयपीएस नवदीप अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी लता फड आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अविनाश पुरी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी सर्वांनीच नेत्रदानाचा संकल्प करून समाजाला प्रेरणादायी संदेश दिला.
या कार्यक्रमात डॉ. शुभम मुथाल, राहुल कासदे आणि नेत्रदान समुपदेशक रमेश ठाकरे यांनी नेत्रदानाचे महत्त्व, प्रक्रिया आणि गरज याबाबत माहिती दिली. “नेत्रदान हे श्रेष्ठ दान असून यामुळे दृष्टिहीन व्यक्तीच्या जीवनात प्रकाशाचे नवे किरण फुलतात,” असे प्रतिपादन मान्यवरांनी केले.
नेत्रदान पंधरवड्याचा मुख्य उद्देश म्हणजे –
???? समाजात जागृती निर्माण करणे
???? अधिकाधिक लोकांना नेत्रदानासाठी प्रवृत्त करणे
???? “अंधारातून प्रकाश” देण्याच्या चळवळीत नागरिकांचा सहभाग वाढवणे
या प्रसंगी आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
आपल्या प्रतिक्रिया द्या....