कारंजा (लाड) समाजकार्यासाठी अविरत कार्यरत असलेले,दैनिक मातृभूमिचे तालुका प्रतिनिधी युवा पत्रकार समिर देशपांडे यांच्या मातोश्री श्रीमती शीलाबाई प्रभाकरराव देशपांडे यांचे वयाच्या 82 व्या वर्षी अल्पशा आजाराने दि.07 मार्च 2025 रोजी पहिल्या प्रहरात दुःखद झाले.त्यांची
अंत्ययात्रा दि. 07 मार्च 2025 रोजी दुपारी 3 :00 वाजता श्री समिर देशपांडे यांचे राहते घर मोठे राममंदिर कारंजा येथून निघून जाणता राजा चौक बायपिस स्थित हिंदु स्मशानभूमी कारंजा येथे पोहोचल्यानंतर त्यांचे चिरंजीव समिर देशपांडे यांनी यांनी साश्रू नयनांनी त्यांचेवर अंत्यसंस्कार केले.त्यांच्या अचानक झालेल्या निधनाबद्दल सर्वत्र शोक संवेदना व्यक्त केल्या जात असून, स्थानिक विश्व हिंदु परिषद कारंजा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,भाजपा परिवार कारंजा, स्व.प्रकाशदादा डहाके मित्र मंडळ कारंजा,
श्री राम नवमी उत्सव समिती,
श्रीराम व्यायाम शाळा, श्रीराम स्टिल सेंटर,श्री नृसिह सरस्वती स्वामी संस्थान मित्रमंडळ कारंजा, आई श्री कामाक्षा माता मित्र मंडळ कारंजा, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ कारंजा,दैनिक मातृभूमि परिवार,साप्ताहिक करंजमहात्म्य परिवार कारंजा, विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा, शहर व ग्रामिण पोलीस स्टेशन पोलीस वृंद कारंजा इत्यांदीकडून भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करण्यात आली आहे.यावेळी कारंजा शहरातील असंख्य नागरीकांची उपस्थिती होती.