कारंजा (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) : दिनांक 19 जुन २०२३ रोजी कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाचे आ. राजेंद्र पाटणी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कारंजा शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन त्यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले.कांचन विहार येथील कार्यक्रमात बोलतांना त्यांनी सांगितले की, कोटयावधी रुपयाची कामं आणली असुन शहरातील कामं टप्प्या टप्प्याने सर्व मार्गी लावु. आपण आम्हास नगर परिषद द्या.भाजपाला नगर परिषदेत निवडूण आणा .आपली भाजपाची लोकं तिथं पाठवा.संपुर्ण नगर क्षेत्राचा भक्कम विकास त्यामुळे होइल. भूमिपूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपा शहर अध्यक्ष ललित चांडक होते. प्रमुख उपस्थिती भाजपा तालुकाध्यक्ष डॉक्टर राजीव काळे ,प्रमुख उपस्थिती न. प. सहाय्यक अभियंता घोघरे होते. कारंजा नगरपरिषद हद्दीतील नागरी दलितोत्तर वस्त्यांमध्ये सुधारणा अंतर्गत कामे व वैशिष्ट्यपूर्ण निधी अंतर्गत खालील विकास कामांचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.कारंजा येथील नगर परीषद हद्दीतील हटोटी पुरा येथे प्रभू स्वामी मठाच्या सभागृहाचे बांधकाम करणे अंदाजित किंमत 12,31,949 लक्ष या कामाचे भूमिपूजन, दत्त मंदिर येथे काळा मारुती मंदिराचे सभागृह बांधकाम करणे अंदाजित किंमत 18,15,364 लक्ष या कामाचे, नेहरू चौकात दत्त चौक ते टिळक चौक ते नेहरू चौक रस्ता कॉंक्रिटीकरण करणे व नाली बांधकाम करणे अंदाजित किंमत 133,43,000 या कामाचे, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या पाठीमागे हनुमान मंदिराचे सभागृहाचे बांधकाम करणे अंदाजित किंमत 11,04,607 या कामाचे, कांचन विहार येथे हिंगणघाट ते देशमुख चतुरकर ते पांडे ते मंदिर लाहोटी ते ते अग्रवाल ते ठाकरे ते ते मुर्तीजापुर रोड पर्यंत रस्ता व नाली बांधकाम करणे अंदाजित किंमत 134,46,000 लक्ष या कामाचे, एस के फंक्शन हॉल ते नागपूर हायवे पर्यंत डांबरीकरण करणे अंदाजित किंमत 100,55,680 लक्ष या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन भारतीय जनता पार्टी, कारंजा शहर यांनी केलेहोते. कार्यक्रम प्रसंगी सर्वश्री भाजपा शहर सरचिटणीस शशी वेळूकर, तालुका उपाध्यक्ष राजीव भेंडे , अशोकभाऊ इन्नानी,युवा मोर्चा अध्यक्ष गढवाले, दिनेश वाडेकर, सविज जगताप, संकेत नाखले, मोहन पंजवाणी, शुभम बोनके, अक्षय देशमुख, सौ. पायल तिवारी, मेघा बांडे, पिंकी शुक्ला, अनिता ठोरसे, गौरव कुर्मावंशी, बंटी डेंडुळे, सत्यजीत उर्फ बंटीभाऊ गाडगे , ललित तिवारी ,अभिनव तापडिया संदीप कुऱ्हे, दिनेश डोईफोडे कुणाल महाजन ,विनय गुल्हाने ,किरण क्षार ,हरीश गोसर, किशोर धाकतोड, जाधव गजानन, प्रसन्ना साखरकर, फुलाडी सर, बाळू चौधरी, देशपांडे , वडते सर, दत्ता देसाई, सुनील गोडसे, नितीन गढवाले, जोशी महाराज, डॉ.सौ.उपाध्ये,सुनील भिंगारे, अनिल गोसर, प्रवीण साबू, प्रा.राजा गोरे, इत्यादी सह अन्य नागरीक उपस्थित होते. व्यासपिठावरील मान्यवरांचा सत्कार विविध कार्यक्रम स्थळी करण्यात आला. करण्यात असे भाजपा तालुका प्रसिध्दी प्रमुख तथा आमदार पाटणी यांचे स्वीय सहाय्यक संजय भेंडे यांनी महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांना कळविले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....