कारंजा तालुका प्रतीनिधि:-
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च मध्यमिक शिक्षण मंडळाने 27 मे रोजी माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षा मार्च 2024 चा ऑनलाईन निकाल घोषित केला आहे. त्यामध्ये बाबासाहेव धाबेकर माध्यमिक विद्यालय यावर्डीचा माध्यमिक शालांन्त प्रमाणपत्र परिक्षा 2024 चा निकाल 97.29% लागला आहे.
सदर परिक्षेला या विद्यालयातून 37 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते, त्यापैकी 36 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी 19 विद्यार्थी प्राविन्य श्रेणीत, 04 विद्यार्थी प्रथम श्रेणीत, 07 विद्यार्थी द्वितीय श्रेणित तर 06 विद्यार्थी पास श्रेणित उतीर्ण झाले आहेत.
कु.प्राची हिम्मत आडोळे या विद्यर्थिनीने 89.% गुण प्राप्त करून विद्यालयातून प्रथम येण्याचा बहुमान प्राप्त केला आहे.
प्रेम सुरेश उबाळे याने 86.80% गुण घेऊन द्वितीय क्रमांक,आचल किसन आमले हीने 86.60% गुन मिळवून तृतीय क्रमांक, वेदिका निरंजन करडे हीने 86.20% गुन घेवून चवथा तर आचल डीगांबर दिहाडे व विश्वास सिद्धार्थ इंगोले यांनी 84% गुन घेवून पाचवा क्रमांक प्राप्त केला आहे.
मराठी 90 गुण व गणित विषयात 95 गुण घेऊन प्राची आडोळे हिने विद्यालयातून सर्वाधिक गुण मिळवले, तसेच वेदिका करडे हिने इंग्रजीत 88 व हिंदी विषयात 87 गुण मिळवले, आचल आमले हिने विज्ञान विषयात 90 तर आरती बोनके हिने सामाजिक शास्त्र या विषयात 89 गुण प्राप्त केलेत.
शाळेचे संस्थाध्यक्ष योगेश केशवराव खोपे, मुख्याधापक विजय भड, शिक्षक राजेश शेंडेकर, शालिनी ओलीवकर, गोपाल काकड, अनिल हजारे, शिक्षकेत्तर कर्म देविदास काळबांडे, भालचंद्र कवाने, राजु लबडे, राजेंद्र उमाळे, राजेश लिंगाटे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असल्याची माहिती मिळाल्याचे महाराष्ट्र राज्यस्तरीय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी कळवीले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....